Jayant Patil : विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त आहे.  या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार जयंत पाटील यांनी ही चूक  सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. 


विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार एकनाथ खडसे असावे यासंदर्भात पक्षाच्यावतीने सभापतींना पत्र देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र जयंत पाटील यांनी सभागृहात दाखवले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. त्यामुळे माझ्याकडे असलेले पक्षाचे गटनेता पदही धोक्यात आले आहे, असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.


नागालँडमध्ये रीओ हे सर्व पक्षाचा पाठिंबा घेतात, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी पद्धत राज्यात सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते, असा मिश्किल टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.











शेतकऱ्यांकडे सरकार कसं बघतंय हे कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा दिसलं : जयंत पाटील
कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नवीन नाहीत. त्या नेहमीच्याच आहेत, अशी जर भावना कृषीमंत्र्यांच्या मनात असतील, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार कसं बघतंय, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांची काळजी न घेणारे सरकार आहे. सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शेतकरी आत्महत्या थांबवल्या पाहिजे, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलं.


आणखी वाचा :


Jayant Patil : आभाळभर घोषणा, पण खिशात पैसा किती याचं तारतम्य नाही; देव सुद्धा यांच्या नावानं ठणा ठणा करतील; जयंत पाटलांची बोचरी टीका