Chhagan Bhujbal Walk Out : राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करुन देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून (Agriculture Minister) संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान द्या अशी मागणी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सभागृहातून (Maharashtra Assembly Session) वॉक आऊट करत सरकारचा निषेध नोंदवला.


अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे रोजच आंदोलने होत आहेत. दुसरीकडे विधानभवनात देखील शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत आहे. छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले की, राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान द्या अशी मागणी केली.


'सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत'


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम 57 अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिप्पणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.


ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी 1200 रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज 500 रुपये तर जास्तीत जास्त 700 रुपये भाव मिळत ही सध्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ 300 रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आऊट करत सरकारचा निषेध नोंदविला.


इतर महत्त्वाच्या बातम्या :