वर्धा : सोशल मीडियावर व्हायरल होणार्या मेसेजवरून काहींची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न होतात तर काहींच्या प्रतिमेवर चिखलफेक केली जाते. सोशल मिडीयावरील अनेक संदेश खळबळ निर्माण करणारे ठरतात. असाच एक प्रकार वर्ध्यात घडला आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा आंतरिक सर्व्हे असं नाव दिलेला एक मेसेज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचं लेटरहेड वापरून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकाराने भाजपच्या स्थानिक नेत्यांना धडकी भरली आहे.
या लेटरहेडवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं ठळक अक्षरात नमूद केलं आहे. तसेच यावर संघाच्या दिल्लीतल्या कार्यालयाचा पत्तादेखील आहे. त्याला आंतरिक सर्व्हे असे नाव देण्यात आले आहे. 20 सप्टेंबर 2019 अशी तारीखही त्यावर लिहिली आहे. त्यावर वर्धा विधानसभा मतदारसंघ जाती आणि उमेदवार असा तक्ता आहे. वेगवेगळ्या चार क्रमांकांवरून हे सर्व्हेक्षण व्हाट्सअॅपवर व्हायरल केल्यानंतर हे क्रमांक स्विच्ड ऑफ करण्यात आले आहेत. या मेसेजने राजकीय गोटात चांगलीच खळबळ निर्माण केली आहे.
या लेटरहेडवर विद्यमान आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. सचिन पावडे या संभाव्य उमेदवारांच्या नावांचा सर्व्हे देण्यात आला आहे. त्यापुढे आठ जाती-धर्मांची नावं लिहित प्रत्येक जाती, धर्मातून या उमेदवारांना पसंतीची टक्केवारी लिहिण्यात आली आहे.
सर्व्हेतील टक्केवारीनुसार माजी खासदार सुरेश वाघमारे यांना सर्वाधिक पसंती दर्शवली गेली आहे. यामध्ये नगराध्यक्ष अतुल तराळे दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांना तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
यामध्ये वाघमारेंना 33 टक्के, तराळे 31 टक्के, भोयर 20 टक्के तर पावडे यांना 14 टक्के पसंती दाखवण्यात आली आहे. अद्याप तिकीटं जाहीर झालेली नाहीत. अशात हा सर्व्हे सर्वांचीच डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे.
या प्रकारणाची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्यांनी पोलीस ठाणे गाठले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अशा प्रकारचे सर्व्हेक्षण केलं जात नाही, खोडकर वृत्तीनं हा प्रकार घडवून आणला असून संघाच्या प्रतिमेला यामुळे धक्का लागण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकार्यांनीही याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे संघाकडून व्हायरल? राजकीय वातावरण तापले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2019 05:59 PM (IST)
सोशल मीडियावर व्हायरल होणार्या मेसेजवरून काहींची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न होतात तर काहींच्या प्रतिमेवर चिखलफेक केली जाते. सोशल मिडीयावरील अनेक संदेश खळबळ निर्माण करणारे ठरतात. असाच एक प्रकार वर्ध्यात घडला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -