Maharashtra Assembly 2019 MLA List : वर्धा : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे  (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Vidhan Sabha Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, आगामी विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या असून, ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अशातच राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस गेल्या लोकसभेला तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली.


परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळवली आणि विजयही! ऐकूनात विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधनसभा निवडणुकीला नेमकं कुणाची हवा असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघात सध्या आमदार कोण? हे जाणून घ्या सविस्तर.


वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04 (Wardha MLA List)


1) आर्वी विधानसभा - दादाराव केचे (भाजप)
2) देवळी विधानसभा - रणजित कांबळे (काँग्रेस)
3) हिंगणघाट विधानसभा - समीर कुणावार (भाजप)
4) वर्धा विधानसभा - पंकज भोयर (भाजप)


2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य


1) वर्धा  विधानसभा क्षेत्र


2019 च्या विधानसभा निवडणुकीत वर्धा  विधानसभा मतदारसंघातून भाजपचे पंकज भोयर हे विजयी झाले होते. त्यावेळी त्यांची थेट लढत काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांच्यात झाली होती. तर यावेळी वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अनंत उमाटे हे देखील मैदानात होते. मात्र अतितटीच्या या सामन्यात 79 हजार 739 मते घेऊन भाजपचे पंकज भोयर हे विजयी झाले होते. तर 79739 मत मिळवत काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांना हार स्वीकारावी लागली.


2) आर्वी विधानसभा क्षेत्र


2019 च्या विधानसभा निवडणुकीत आर्वी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमर काळे आणि भाजपचे माजी आमदार दादाराव केचे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. मात्र यात भाजपचे दादाराव केचे यांना पराभवाला समोर जावे लागले. तर काँग्रेस अमर काळे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मोहर उमटवत दणदणीत विजय मिळवला होता. अतितटीच्या या सामन्यात अमर काळे यांनी 74 हजार 851 मते घेऊन भाजपचे दादाराव केचे यांना पराभूत केलं. तर दादाराव केचे यांना 87 हजार 318 मत मिळवत हार स्वीकारावी लागली.  


3) हिंगणघाट विधानसभा


हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील विधानसभा 2019 च्या निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.  तर राष्ट्रवादीचे नेते एडवोकेट सुधीर कोठारी यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी हा अर्ज मागे घेत त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. हिंगणघाट मध्ये  भाजपचे आमदार समीर कुणावर आणि राष्ट्रवादी चे माजी आमदार राजू तिमांडे यांच्यात लढत झाली. मात्र या लढतीत भाजपच्या समीर कुणावर यांनी तब्बल 1 लाख 3 हजार  585 मते घेऊन राष्ट्रवादीच्या राजू तिमांडे यांचा पराभव केला. भाजपचे समीर कुणावर यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर राजू तिमांडे यांना 53 हजार 130 मते पडली  असून त्यात त्यांचा पराभव झाला होता..


4) देवळी विधानसभा 


 2019 च्या विधानसभा देवळी मतदारसंघात  काँग्रेसचे उमेदवार रंजीत कांबळे, शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख  आणि 
अपक्ष उमेदवार राजेश बकाने यांच्यात थेट लढत झाली होती. यात मात्र काँग्रेसच्या रणजीत कांबळे यांचा दणदणीत विजय झाला होता.  महायुतीत शिवसेनेचे समीर देशमुख उमेदवार राहिल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बिगाने यांच्या स्वप्नाला सुरुंग लागली होती. भाजपमधील आपल्या पदाचा राजीनामा देऊन अपेक्षा उमेदवारी दाखल केली होती. भाजप मध्ये बंडखोरी झाल्यामुळे त्याचा फटका महायुतीला सहन करावा लागला. तर आमदार रणजीत कांबळे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर सलग चार वेळा  विजय संपादन केल्यानंतर पाचव्यांदा देखील  त्यांनी देवळी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारले.


2019 मध्ये कुणाला किती मतं?


वर्धा विधानसभा


काँग्रेस - शेखर शेंडे (71806)
भाजप - पंकज भोयर(79739)
वंचित बहुजन आघाडी - अनंत उमाटे (6383)



  • विजयी - पंकज भोयर भाजप


आर्वी विधानसभा क्षेत्र


काँग्रेस - अमर काळे(74851)
भाजप - दादाराव केचे ( 87318)
अपक्ष - दीपक मडावी (6031)



  • विजय - दादाराव केचे


हिंगणघाट विधानसभा


भाजप - समीर कुणावार(103585)
एनसिपी - राजू तिमांडे ( 53130)
अपक्ष - अशोक शिंदे (12623)



  • विजयी - समीर कुणावार


देवळी विधानसभा


काँग्रेस - रणजित कांबळे ( 75345)
अपक्ष  - राजेश बकाने (39541)
शिवसेना - समीर देशमुख( 30978)



  • विजयी - रणजित कांबळे


भाजप - समीर कुणावार(103585)
एनसिपी - राजू तिमांडे ( 53130)
अपक्ष - अशोक शिंदे (12623)