पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावल्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू पार्थ पवारांच्या निवडणूक लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणा आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्जदेखील केला आहे. निवडणूक लढवण्यासाठी याच मतदारसंघाची निवड का केली? याबाबत रोहित पवारांनी खुलासा केला आहे.

रोहित पवारांनी याबाबत माहिती देण्यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये रोहित यांनी म्हटलं आहे की, या मतदारसंघात काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी आहे. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. कर्जत जामखेड मधील तरुणांशी, महिलांशी, विद्यार्थ्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केलीच, परंतु जेव्हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली, तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

व्हिडीओ पाहा



रोहित पवार यांनी म्हटले की, वयाच्या 21 व्या वर्षी मी व्यावसायिक क्षेत्रात आलो. तेव्हा लोकांनी प्रश्न विचारले हे वय तर जग फिरायचे असते, इतक्या लवकर जबाबदारी का? तेव्हा माझं उत्तर होतं ते म्हणजे मला काम करायचं आहे. माझे आजोबा अप्पासाहेब पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करुन शेती, सहकार, पाणी, शिक्षण अशा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले होते. नगर जिल्ह्यात जेव्हा मी फिरत असतो तेव्हा आजही त्यांचे आणि त्यांनी केलेल्या कामांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या पश्चात वडिल राजेंद्रदादा आणि आई सुनंदा पवार हे ही जबाबदारी प्रसिद्धीपासून दूर राहत जमिनीवर पाय ठेवून पार पाडत होते. त्याच विश्वासाने व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. आज माझ्या व्यावसायिक क्षेत्राकडे पाहिले तर मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो, ती म्हणजे या विश्वासाला आणि प्रामाणिकपणाला तडा जाईल अस काम माझ्याकडून झालेलं नाही आणि होणारदेखील नाही.

शेतकऱ्यांना भेटून प्रश्न जाणून घेण्याच प्रयत्न : रोहित पवार | बारामती | ABP Majha



जिल्हा परिषद सदस्य म्हणून अर्ज दाखल करत असताना लोकांनी विचारलं व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी असताना, घराण्याचा मोठ्ठा राजकीय वारसा असताना जिल्हा परिषदच का? तेव्हा माझं उत्तर होतं मोठ्या कुटुंबात जन्म घेणं ही नशिबाची आणि अभिमानाची गोष्ट असू शकते. आदरणीय पवार साहेबांच्या राजकारणाचा वारसा आहेच त्याहून ती मोठ्ठी 'जबाबदारी' आहे. शुन्यातूनच गोष्टी समजावून घेवूनच स्वत:च कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तळागाळातील समस्यांना भिडलो. तळागाळातील समस्या समजून घेवून शिक्षण, आरोग्य, युवक, महिला, क्रिडा, बेरोजगारी अशा प्रत्येक ठिकाणी शक्य तितकं काम यशस्वीपणे करु शकलो.

VIDEO | घराणेशाहीवर रोहित पवारांचं भाषण



आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकिय क्षेत्र ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, तसाच विश्वास ते टाकतील किंबहूना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.