तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही, आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांना  मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.  तसेच नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका देखील केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले त्यावेळी ते बोलत होते. 


शिवसेना- मनसे युती हा विषय आता इतिहास जमा


"बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्वी सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. काही लोक स्वतःला पक्ष प्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. राज्यसभेच्या पराभवानंतर नांदगावकर यांनी शिवसेनेला टोला लागावला. राज्यसभेच्या निकलापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षा व्यक्त केली.  विधानपरिषदेत योग्य ते घडेल असे सूचक वक्तव्य केले. शिवसेना- मनसे युती हा विषय आता इतिहास जमा असल्याचे नांदगावकर म्हणाले.


आगामी महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार 


आगामी महानगरपालिका व इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. मनसे आपली लढाई स्वबळावर लढाई लढणार आणि निवडून येणारं असल्याचे भाकीत त्यांनी केले. बाळा नांदगावकर यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली. आम्ही आधीही एकला चालोरे होते, आज ही एकला चलो रे आहोत. कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुका लढवाव्या असे स्पष्ट आदेश दिले आहेत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रापुरतीच कार्यक्षेत्र मर्यादित राहणार असल्याची घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रबाहेर राजकीय विस्तार करणार नाही. युपी, बिहार झारखंड या राज्यातून मनसे पक्ष स्थापनेची मागणी होत आह.  मात्र आम्ही महाराष्ट्रातच लक्ष घालणार आहोत व जगाला हेवा वाटेल महाराष्ट्र घडवून आदर्श निर्माण करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐवजी हिंदू नवनिर्माण सेना करा अशी मागणी होते आहे मात्र आम्ही महाराष्ट्र पुरतेच काम करणार आहेत. मनसेची वाढ महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात झाली आहे असेही ते म्हणाले. शिवभोजन योजनेचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कौतुक केले. शेतकरी विद्यार्थी कामगार महिला यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विषयी लोकात आपुलकी राहिली नाही असे मत नांदगावकर यांनी व्यक्त केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे नांदगावकर यांनी तुळजाभवानीकडे केली आहे.