Parbhani News : राज्याच्या ऊर्जा विभागाकडून थकीत वीज बिल वसुलीसाठी कठोर मोहीम राबवण्यात आली. मात्र या मोहमेअंतर्गत ज्या अधिकाऱ्यांनी सुमार कामगिरी केलीय. त्यांच्या विरोधात आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांनी त्यांच्या मंडळात केलेल्या सुमार कामगिरीमुळे महावितरणच्या संचालकांकडून थेट निलंबन करण्यात आले आहे. या निलंबन कारवाई विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशियन वर्कर्स फेडरेशन निदर्शनं करणार आहे.


सुमार कामगिरी मुळे महावितरण संचालकांनी केले निलंबित 


परभणीचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना त्यांच्या मंडळासाठी थकीत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, जे पूर्ण करण्यासाठी त्यांनी दुर्लक्ष केले, शिवाय त्यांच्या काळात परभणी मंडळाची कामगिरी ही अत्यंत सुमार राहिली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या काळात रोहित्रांमध्ये बिघाडाचे प्रमाण सीमित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले ज्यातून वीज विक्री कमी झाली, मोठ्या प्रमाणावर वीजबिलांची शिल्लक थकबाकी राहिली, असेही त्यांच्या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले.


महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशियन वर्कर्स फेडरेशन निदर्शनं करणार 


या पार्श्वभूमीवर काल सांघिक कार्यालय स्तरावर झालेल्या आढावा बैठक झाली. ज्यात या सर्व बाबींवर चर्चा झाल्यानंतर परभणीचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश महावितरणचे संचालक व सक्षम अधिकारी संजय ताकसांडे यांनी काढला आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या


Devendra Fadanvis : चालली नाही पवारांची 'पॉवर',  राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर


Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर धनं'जय'..., भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत


Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय