मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena)  57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज शिबिराचं आयोजन केलं आहे. वरळीतील NSCI इथं हे मोठं शिबिर पार पडणार आहे.  या शिबिरात नव्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड केली जाईल. याशिवाय आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने केल्या जातील.दरम्यान मुंबईत येताच आदित्य ठाकरेंनी शिबीराच्या तयारीची पाहणी केली. मेळाव्याला जवळपास सहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. 


शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी  हे पाऊल उचललं जाणार आहे.   शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे.कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.  


सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे.  18 जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रमुख म्हणून फेरनिवड होणार आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.  वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रात ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.


वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून पूर्ण


उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी काडीमोड घेतला आणि शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो याच शिवसेनेचा येत्या 19 जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. 


हे ही वाचा :


Shishir Shinde: शिशिर शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे राजीनामा