Vehicle VIP Number: राज्य परिवहन विभागानं (State Transport Department) शुक्रवारी महाराष्ट्रातील कार आणि बाईकसाठी व्हीआयपी नंबरसाठी शुल्क वाढवण्याची मसुदा अधिसूचना जारी केलीय. सर्वाधिक मागणी असलेला 'नंबर 1' आता अधिक महाग झाला आहे. 4 लाखांऐवजी आता 'नंबर 1' मिळवण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील. आरटीओच्या सूत्रांनी सांगितले की सूचना आणि हरकतींसाठी ही एक मसुदा अधिसूचना आहे जी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयाकडून प्राप्त होऊन आणि त्यानंतर राज्य सरकार अंतिम अधिसूचना घेऊन येईल.
दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये येथे 'नंबर 1' ला जास्त मागणी आहे. मात्र, आता या नंबरसाठी 5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. महत्वाचं म्हणजे, आऊट ऑफ सीरीज व्हीआयपी नंबरची किंमत 18 लाखांहून अधिक आहे. इतक्या किंमतीत मिड रेंज सेगमेंटमधील कार खरेदी करता येऊ शकते.
घरबसल्या व्हीआयपी नंबरचं रजिस्ट्रेशन
व्हीआयपी नंबर हवा असल्यास तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर पब्लिक युजर म्हणून तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. तुम्हाला निश्चित शुल्क भरून तुमच्या पसंतीचा क्रमांक आरक्षित करावा लागेल. व्हीआयपी नंबर प्लेट्सच्या अनेक रेंज आहेत,ज्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारलं जातं.
फॅन्सी नंबर म्हणजे काय?
परिवहन प्राधिकरणानं 0001 ते 9999 दरम्यान येणाऱ्या अनेक क्रमांकांना व्हीआयपी नंबर अशी ओळख दिलीय. हे नंबर सुपर एलिट (Super Elite) सिंगल डिजीट (Single Digit) आणि सेमी फॅन्सी (Semi Fancy Numbers) सारख्या श्रेणींमध्ये विभागले आहेत. सुपर एलिट लिस्टमध्ये येणारे क्रमांकांसाठी 1 लाखापासून तर पाच लाखांपर्यंत पैसे मोजवे लागतात. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही किंमत वेगळी असू शकते. तसेच चारचाकी आणि दुचाकी नंबरसाठीची किंमतीही बदल असतो.
हे देखील वाचा-