Maharashtra TET 2021: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET 2021)  टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र आज अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून जारी होणार आहे. अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकणार आहात. ही परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित केली आहे. आधी ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली होती.


आता या परीक्षेचा पहिला पेपर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 1 आणि दुसरा पेपर 2 ते साडेचार या वेळेत होणार आहे.  
 
कसं कराल प्रवेशपत्र डाऊनलोड
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट  mahatet.in वर जा
तिथं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासंबंधी नोटिफिकेशनवर क्लिक करा  
आपला अनुक्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करा. 
त्यानंतर स्क्रिनवर प्रवेशपत्र दिसेल. 
हे प्रवेशपत्र डाऊनलोड करा, जे आपल्याला भविष्यात संदर्भासाठी सोबत ठेवा.
 
परीक्षा 31 तारखेला, कोरोना नियमांचं करावं लागणार पालन
 
ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींना प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे. तसंच सर्व कोरोना नियमांचं देखील करावं लागणार आहे. परीक्षेला येताना मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवावं लागणार आहे. सोबतचं परीक्षार्थींमध्ये सामाजिक अंतर देखील ठेवलं जाणार आहे.  


जुलै महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती की राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या टीईटीची परीक्षा होत आहे. त्यामुळे 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी परीक्षेसाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे.  टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे.  पेपर एक हा पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आणि पेपर दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI