Maharashtra Temperature : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर कुठे उष्णतेच्या लाट आली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपूरमध्ये तर उन्हाचा कडाक्याने सर्वच विक्रम मोडले आहे. मागील तीन दिवसांत चंद्रपूरमधील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी चंद्रपूरमधील तापमान 44 अंशसेल्सिअसवर पोहचले आहे. 2019 मध्ये चंद्रपूरचे तापमान 47 अंशाच्या पुढे गेले होते. आता हा विक्रम मोडला जाणार का? याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे. मार्च महिन्यामध्येच एवढी गर्मी पडली तर मग एप्रिल-मे महिन्यात तर काय होईल, याचा विचार करुनच नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, नियमीत पाणी प्या, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकांनी घरी कुलर्स, एसी सुरू केलेत. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाच्या झळा पोहचतात. त्यामुळं माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही काळजी घ्यावी. 


महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. त्यानुसार विदर्भासह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार अनेक ठिकाणी उष्णता वाढली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 19 मार्च, IMD ने येथे सूचित केल्यानुसार 19 ते 21 मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस /गडगडाटाची शक्यता आहे.


राज्यात अनेक शहरांमध्ये वातावरण प्रचंड उकाडा झाला आहे. राज्यातील काही ठिकाणाचे तापमान 40 अंशसेल्सिअसच्या जवळ पोहचले आहे. दुपारी एक वाजता पुण्यातील तापमान 37-38  अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. पण अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे पुण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. हमामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तवला आहे


18 मार्च रोजी कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?


औरंगाबाद - 40


परभणी - 40.2


नांदेड - 40


अकोला - 42.2


अमरावती - 41.4


बुलढाणा - 39.8


ब्रह्मपुरी - 40.4


गोंदिया - 39.8


नागपूर - 40.4


वर्धा - 41.4


सोलापूर 41.6°C


सोलापुरात मागील एकही दिवसापासून पारा चाळीसीच्या पार पोहोचला आहे. सोलापुरातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसतेय. त्यामुळे सोलापूरकर देखील हैराण झालेत. सोलापुरात श्रमिक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांची घरे पत्र्याची आहेत. त्यामुळे घरात देखील अंगाची लाहीलाही होतेय. बाहेर तर आगीचे गोळे पडतायत की काय अशी परिस्थिती सोलापुरात निर्माण झाली आहे. मागील 8 दिवसात सोलापुरातील तापमान


11 मार्च 28 °C


12 मार्च 36.2 °C


13 मार्च 37.4 °C


14 मार्च 38.4 °C


15 मार्च 39.3 °C


16 मार्च  41°C


17 मार्च 41.6°C


18 मार्च 41.6°C


राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील दोन ते तीन तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण, साताऱ्यातील घाट परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.