Maharashtra Breaking News Live Updates: ठाकरेंचे कोकणातील महत्वाचे शिलेदार, माजी आमदार राजन साळवी वाजतगाजत शिंदेच्या गोटात सामील झाले. पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात राजन साळवींनी शक्तीप्रदर्शनाची संधी सुद्धा साधून घेतली. तर उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मात्र परिपक्व राजकारण्याची भूमिका बजावली. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी टीकास्त्र सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांनी देखील सुरेश धस यांची भेट नाकरली. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स...