Maharashtra Break The Chain | राज्यात आजपासून कठोर निर्बंध

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Apr 2021 12:54 PM

पार्श्वभूमी

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार म्हणजेच आज 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार...More

आज रात्री आठ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद

राज्यातील लागू केलेल्या निर्बंधामुळे आज रात्री आठ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही कोरोना रुग्णाला बेड मिळणार नाही असं होणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आजूबाजूच्या तीन ते चार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत.