Ministers Bungalow Renovation : राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यावरती पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. या सर्व बंगल्यांचं पाचच महिन्यांपूर्वी नुतनीकरण करण्यात आलेल होतं. आता पुन्हा एकदा तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खरं तर मंत्री वास्तव्याला आल्यानंतर हा खर्च करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा 30 कोटी रुपयांच नुतनीकरण करण्यात येत आहे. यापैकी जवळपास 60 टक्के काम न करता, परस्पर पैसे काढल्याचा आरोप करण्यांत आलाय.
कोणत्या मंत्र्याच्या कुठल्या बंगल्यावरती किती खर्च करण्यात आला?
- सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी, 1 कोटी 50 लाख
- गुलाबराव पाटील- जेतवन 1 कोटी 15 लाख
- राधाकृष्ण विखे पाटील- रॉयल स्टोन, 1 कोटी 58 लाख
- अतुल सावे, शिवगड, 1 कोटी 4 लाख
- अजित पवार- देवगिरी, 19 लाख 89 हजार
- दीपक केसरकर- रामटेक, 75 लाख 42 हजार
- तानाजी सावंत- लोहगड, 87 लाख 46 हजार
- बाळासाहेब भवन- ब्रह्मगिरी, 1 कोटी 57 लाख
- चंद्रकांत पाटील- सिंहगड, 52 लाख 37 हजार
- राहुल नार्वेकर- शिवगिरी, 42 लाख
- विजयकुमार गावित- चित्रकूट, 1 कोटी 54 लाख
- उदय समंत- मुक्तागिरी, 1 कोटी १६ लाख
- संदिपान भुमरे- रत्नसिंधू , ३७ लाख 26 हजार
- दिलीप वळसे पाटील- सुवर्णगड 73 लाख
- अब्दुल सत्तार- पन्हाळगड, 50 लाख
- अदिती तटकरे- प्रतापगड , 35 लाख 19 हजार.
मंत्र्यांचे बंगले आणि त्यांचा वार्षिक देखभाल त्यासाठी 1 कोटी 26 लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यांवरती लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतरही मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यांचं रंगकाम करण्यासाठी 1 कोटी 5 लाखांच्या स्वतंत्र निविदा करण्यात आले आहेत. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 75 लाखाच्या निविदा काढल्या तर आहेतच, मात्र स्टेशनरीसाठीसुद्धा 57 लाखांच्या निवेदन करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बंगल्यावरही खर्च
महायुतीच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या खर्चाबद्दल प्रश्न विचारला असता राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करणे, त्याचा मेंटेनन्स ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं करण्यात येतं. त्यावर काही आक्षेप घेण्यासारखं नाही. महाविकास आघाडीच्या काळातील मंत्रांच्या घरावर किती खर्च झाला याचासुद्धा तपशील मी तुम्हाला देईन.
ही बातमी वाचा: