Continues below advertisement

मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन (ST Workers Protest) करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (Maharashtra State Road Transport Corporation MSRTC) सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेतन (Salary Hike), भत्ते (Allowances), 7 वा वेतन आयोग (7th Pay Commission) आणि दिवाळी बोनस (Diwali Bonus) यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून 'आक्रमक आंदोलन' आणि 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Continues below advertisement

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत. तर कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आहेत.

संघटनेच्या प्रमुख मागण्या (ST Workers Demands):

  • 2006 पासून शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावे.
  • 2016 पासून थकीत घरभाडे, भत्ते आणि महागाई भत्ता द्यावा.
  • 7 वा वेतन आयोग लागू करावा.
  • दिवाळी बोनस 20,000 रुपये द्यावा.
  • आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना 8.5 लाख रुपयांची मदत द्यावी.
  • संप काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
  • रिक्त पदांवर नवीन भरती करावी.
  • खासगी बस घेऊ नयेत, राप महामंडळाच्या स्वतःच्या बस वापराव्यात.
  • महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 43% ऐवजी द्यावा.
  • 2015 पासून जी प्रवास भाडेवाढ झाली आहे त्याची पूर्वलक्षीपणे पूर्तता करावी.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ द्यावा.
  • राप कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत सोडवणूक न झाल्याने "आक्रमक आंदोलन" होणार.

स्थावर मालमत्तेचा मुद्दा (ST Properties Issue)

महामंडळाची स्थावर मालमत्ता (MSRTC Properties) उद्योगयोग्यतेच्या धर्तीवर चालवावी किंवा शासनात विलीन करावी, अशी मोठी मागणी संघटनांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा (ST Workers Protest Alert)

28 सप्टेंबरपासून 'आक्रमक आंदोलन' सुरू होणार असून 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील MSRTC Headquarters समोर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा संघटनेने दिला.