मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्ममिक मंडळाकडून यंदा घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांसाठी संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत.

त्यानुसार बारावीची परीक्षा - 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान होण्याची शक्यता आहे.

तर दहावीची परीक्षा - 1 मार्च ते 24 मार्च 2018 दरम्यान होण्याचे संकेत आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते.

यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात.

संभाव्य वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी आता 163 दिवस म्हणजे जवळपास 5 महिने शिल्लक आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास 155 दिवस शिल्लक आहेत.

हे संभाव्य वेळापत्रक आहे, हेच अंतिम असेल असं नाही, यामध्ये बदल होऊ शकतो.