Sanjay Raut : 2024 च्या निवडणुकीत देशात शंभर टक्के परिवर्तन झालेलं असेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. ते आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीनं आशादायी चित्र असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात (Maharashtra) लोकसभेच्या (Loksabha) 48 पैकी 40 जागा जिंकू असेही राऊत म्हणाले. 


काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल उद्धव ठाकरेंना भेटणार 


काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल हे सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी भेट घेतली आहे. शरद पवार उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली आहे. राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे संजय राऊत म्हणाले.


राहुल गांधींही महाराष्ट्रात येतील 


महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. आम्ही लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू असे वातावरण असल्याचे संजय राऊत म्हणाले. राहुल गांधींची भेट झाली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात यावे असे मी सांगितले होते असे राऊत म्हणाले. त्यानुसार राहुल गांधी देखील महाराष्ट्रात येतील असे राऊत म्हणाले. विरोधी पक्ष एकत्र येतील हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम आहे तो तुटून पडेल असेही राऊत म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद नाहीत : संजय राऊत