Maharashtra School Start Live : स्कूल चले हम... आजपासून राज्यात शाळा सुरु, पाहा महत्वाचे अपडेट्स

Maharashtra School Start Date : आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु झाल्या आहेत. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2022 12:58 PM

पार्श्वभूमी

Maharashtra School Start Date : कोरोना (Corona) आणि त्यानंतर लॉकडाऊन (Corona Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले. पण...More

शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत

आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रवेशद्वारावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं.