Maharashtra School Reopen LIVE Updates: एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करा: उद्धव ठाकरे

आज सोमवार 4 ऑक्टोबर राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Oct 2021 01:16 PM

पार्श्वभूमी

मुंबई : आज(सोमवार 4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होणार आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी...More

एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करा: उद्धव ठाकरे


गेल्या दीड वर्षानंतर आपल्या शाळा उघडल्या आहेत. आता त्या पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करुयात असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.