Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन लवकरच होणार आहे. याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरली असून 4 मार्चला या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) ते उपराजधानी नागपूर (Nagpur) या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा
समृध्दी महामार्गाचा तिसरा टप्पा हा भरवीर ते इगतपुरी असा असणार आहे. हा महामार्ग 4 मार्च पासून वापरात येणार असल्याची माहिती आहे. भरविर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा टप्पा आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून डिसेंबर 2022 मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी 520 किमीचा महामार्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू आहे.
25 किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा
समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कधी होणार, याबाबत चर्चा सुरू होती, मात्र 4 मार्चला हा महामार्ग प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे. हा महामार्ग भरवीर ते इगतपुरी असून याच्या 25 किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे, मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च 2024 मध्ये हा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंचर समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा कार्यान्वित होणार आहे.
तब्बल दीड तास वाचणार, वाहतूक कोंडी कमी होणार
समृद्धी महामार्गाच्या भरवीर-इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांचा प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार आहे. त्यामुळे इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.
हेही वाचा>>>
CM Eknath Shinde : भराडी देवीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले, उद्यापासून आंगणेवाडी यात्रेला सुरुवात