मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम होणार नाही असं कदाचित सांगितलं जातं, असा आरोप रोहित यांनी केला आहे. शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन असलेले  प्रतिज्ञापत्र  अजित पवारांना दिल्याची बातमी आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले त्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) आरोप केले आहे.


रोहित पवार म्हणाले, एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच नावं दिलं आहे का बघावं लागेल. आमदारांचे एखादं महत्त्वाच काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहे. ब्लॅकमेल करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर काम होणारं नाही असं सांगितल जातं आहे.  


न्यायालयात आमचा विजय होणार


शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना आपत्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटाने विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले, काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर हे करण्यात आलं असेल. त्यांची ती रणनिती असेल आम्ही आम्ही कारवाई करत आहोत. हा लढा कोर्टात जाईल आणि विजय आमचा होणार आहे. 


सरकार मराठा, धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही


रोहित पवारांनी धनगर आरक्षणावर टीका केली आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार मराठा, धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही. हे केवळ शाब्दिक खेळ करणारे सरकार आहे. या सरकारच असं आहे की बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. नंतर वेळखाऊपणा करायचा. आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात सुटणार नाही त्यासाठी केंद्रात जाणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस कोट्याला जशी घटना दुरुस्ती केली तशीच घटना दुरुस्ती गरजेची आहे. भाजपला हे आरक्षण नको आहे असं चित्र आहे. 2014 साली फडणविस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार मात्र अजून काही केलं नाही  


डाग पुसण्याच काम भाजप करत आहे


महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभा, राज्यसभेत मंजूर झाले. त्याविषयी बोलताना रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.  मणिपूरमध्ये घटना घडली त्यानंतर महिला पैलवान अनेक दिवस आंदोलन करत होते.  हे डाग पुसण्याच काम भाजप करत आहे. त्यांना आरक्षण आणायचं नाही.  त्यांना खरच आरक्षण द्याचे  होतं तर 2024 साली द्यायला हवं होतं. जे होणारं नव्हतं त्यासाठी अधिवेशन घेऊन एवढा गाजावाजा कशाला केला? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.  


हे ही वाचा :


Ajit Pawar VS Rohit Pawar: काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा अध्याय, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार आमनेसामने