Maharashtra Corona Update : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरता दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 45 हजार 905 ॲक्टिव रुग्ण आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.54 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,64,37,416 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी  78,42,949 (10.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 94 हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,380 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


218 ओमायक्रॉनचे रुग्ण -
राज्यात आज 218 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी 201 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था व 17  राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा  यांनी रिपोर्ट केले आहेत. आज आढलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबई 172, पुणे मनपामध्ये 30, गडचिरोलीमध्ये 12 आणि पुणे ग्रामीणमध्ये चार रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, राज्यात आतापर्यंत 3986 एकूण कोरोना रुग्णांपैकी 3334 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.   


 






मुंबईत 288 नवे कोरोना रुग्ण -


मुंबईत रविवारी 288 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येतील घट आजही कायम राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 288 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 532 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.