Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे.  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


राज्यात सध्या 36 हजार 447 ॲक्टिव रुग्ण आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 76,61,077  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.66 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे.  याशिवाय राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मुंबईत आढळले आहेत.


मुंबईतील रुग्णसंख्येतही घट


मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत होणारी घट आजही कायम राहिली आहे. मुंबईत सोमवारी 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत 192 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 350 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 513 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 दिवसांवर आला आहे. रविवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल 294 दिवसांची वाढ झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha