Maharashtra Rains Live Updates : लातूरसह नांदेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
Rain : आजपासून राज्यात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
तुगाव येथे ढगफुटी तर हालसी येथे जोरदार पाऊस ...गावातील रस्त्यांना आले नदीचे रूप ...प्रत्येक गल्लोगल्ली वाहत होते पाणी
Latur Rain : तुगावं हे कर्नाटकातील गाव तर हालसी हे महाराष्ट्रातील गाव. या दोन्ही गावांच्या मधून मांजरा नदी वाहते. काल संध्याकाळी या भागात दीड तास पावसानं कहर केला. कर्नाटकातील तूगाव येथे कधी नव्हे ते असा पाऊस झाला. 10 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कधीच शेत शिवारात पाणी आलं नव्हते. मात्र, आता गावातील प्रत्येक रस्त्याला ओढ्याचे रुप आले आहे. गावातील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. गावातील प्रत्येक रस्ता हा नदीसारखा वाहत होता. यावरुन पावसाचा जोर लक्षात येतो. या गावाच्या शिवारातील सोयाबीन पीक वाहून गेलं आहे. दुबार पेरणीही शक्य नाही कारण पाण्याबरोबर माती खरवडून गेली आहे. तुफान पाऊस चालू असताना वीजही गायब झाली होती. तूगाव येथे ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे.
Nanded Rain : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. तर नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर नांदेड शहरातील,आनंदनगर, भाग्यनगर, बाबानगर, तरोडा नाका, कॅनॉल रोड परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहनधारकांना व नागरिकांना रस्त्यावरुन चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शहरातील उखडलेले रस्ते, महापालिकेनं न केलेली नाले सफाई यामुळं शहर मात्र तुंबल आहे. ज्यामुळं शहरातील रस्त्यावर वाहनांच्या रंगाच रांगा लागल्या असून, ट्रॅफिक जाम होत आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने नाचणी लागवडीला वेग आला आहे. तर भरड शेती भागात पावसाने उसंत घेतल्याने भूईमुग लागवडीची लगबग सुरु झाली आहे. मालवणमधील आचरा परिसरात भात लागवडीबरोबरच महत्त्वाचे पीक म्हणून भुईमूग, नाचणीची लागवड केली जाते. त्यामुळे नाचणी लागवडीच्या काम करताना शेतकरी वर्ग दिसत असून शेती शिवारे फुलून गेली आहेत. आपल्या आहारातील नाचणीचे महत्त्व आणि वाढत्या मागणीमुळे नाचणी पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. या पिकाची लागवड वरकस जमिनीत केली जाते. नांगरणी करुन जमीन भुसभुशीत केल्यावर जमिनीवर शेणखत पसरले जाते. काढलेली नाचणीची रोपे लावली जातात. सध्या पावसाने उसंत घेतली असल्याने नाचणीच्या लागवडीकडे शेतकरी वळला आहे. यामुळे शेत शिवारात वर्दळ वाढली आहे.
Nanded Rains : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची जोरदार फटकेबाजी सुरु आहे. तर नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक सखल भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे. नांदेड शहरातील आनंद नगर, भाग्यनगर, बाबानगर, तरोडा नाका, कॅनॉल रोड परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना रस्त्यावरुन चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान शहरातील उखडलेले रस्ते, महापालिकेने न केलेली नाले सफाई यामुळे शहर मात्र तुंबलय. ज्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांच्या रंगाच रांगा लागून ट्रॅफिक जाम होत आहे.
Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्यात काल 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी शेत शिवारात वीज पडून काशिनाथ चालखुरे (55) या गुराख्याचा मृत्यू झाला आहे. तर विकास डाखरे (30) हे जखमी झाले आहेत. जिवती तालुक्यातील शेडवाही येथे अनिल सोयाम या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
Mumbai Rains : मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेला अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अंधेरी सबवे खाली 2 ते 3 फूट पाणी भरलं आहे. अंधेरी सबवे सध्या वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे च्या दोन्ही बाजूने वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत. सध्या जनरेटरच्या माध्यमातून सबवेखालून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. अंधेरी सबवे बंद असल्यामुळे सबवे बाहेर वाहतूक कोंडी झाली आहे.
Ratnagiri Rain : मागील 15 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. काल संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी सुरु झाल्या आहेत. पावसाअभावी भात आणि नाचणी शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.
Panvel Rain : नवी मुंबईसह पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Mumbai Rain : मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं अंधेरी सबवेवर 2 ते 3 फूट पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सबवे वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, काही ठिकाणी मुसळदार पावसामामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे.
धुळे पाऊस
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पिके सडण्याचा धोका वाढला आहे, मात्र अद्यापही शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला असून साक्री तालुक्यात सर्वाधिक पावसाने हजेरी लावली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात आणि शिरपूर तालुक्यात पावसाची अत्यंत कमी हजेरी लागली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा चिमठाणे तर शिरपूर तालुक्यातील जवखेडा होळनाथे मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके करपू लागली आहेत. साक्री तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने शेतात पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडण्याचा धोका वाढला आहे.
धुळे जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 16 मंडळात 100 टक्क्यांपेक्षा अधिक साक्री तालुक्यात दोन मंडळात 200 टक्क्यांपेक्षा जास्त तर पाच मंडळात 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यात जवळपास 418 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून शेतात पाणी शिरल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरी आदी पिके सडण्याचा धोका वाढला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -