Maharashtra Rains Live Updates : औरंगाबादमधील पाचोडमध्ये मुसळधार पाऊस, शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. राज्यातील सातारा, सांगली आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते  मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2022 11:24 AM
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून करावा लागतोय प्रवास

Beed Flood : बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना वाट काढताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बीड तालुक्यातील केसापूर येथील एका ओढ्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांना आणि मजुरांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडमध्ये मुसळधार पाऊस, शेताला तळ्याचं स्वरुप

Aurangabad Rain : औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड इथे रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे दिगंबर वाघ यांच्या चार एकर शेतामध्ये तळ्याचा स्वरुप आलं आहे. त्यामुळं शेतकरी दिगंबर वाघ उद्विग्न झाले आहेत.

औरंगाबादच्या अडुळ परिसरात रिक्षा गेली वाहून 

Aurangabad Rain : औरंगाबादच्या अडुळ परिसरातील ब्रम्हणगाव तांडा इथे पावसाच्या पाण्यात रिक्षा वाहून गेल्याची घटना घडली. रस्त्यावर अचानक पूराचं पाणी आल्यानं रिक्षा वाहून गेली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यानं रिक्षातील तीन जमांचा जीव वाचला. दरम्यान, पुराचे पाणी जास्त असल्यानं रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र, अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. तसेच दुसरीकडे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सांगली, सातारा आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली.


तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज 


दरम्यान, राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईतही हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात  तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईतील हवेची  गुणवत्ता पातळी पुणे, दिल्लीपेक्षा चांगली झाली आहे.


राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 112 जणांचा मृत्यू


राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेहोते. विशेषत: मराठवाडा (Marathwada )आणि विदर्भाला (vidarbha)  या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमुळं 112 जणांचा मृत्यू झाला आहे. 
तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.