- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
ब्रेकिंग
Anchor -- पूरग्रस्तांच्या मदतीला धावला विठुराया .. मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल मंदिराकडून 1 कोटीची मदत ..
पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून महावस्त्रे देखील वाटप केली जाणार
V/O -- राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे.
यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंदिर समिती बैठकीत घेण्यात आला.
पूरग्रस्त भागातील नागरिकांचे उभे संसार वाहून गेल्याने हजारो बाधितांना अंगावर घालायला कपडे देखील नाहीत. यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. याचाच विचार करून पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाच्या प्रसादरूपाने महावस्त्रे देखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
मंदिर समिती प्रत्येकवेळी पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करीत असते. ह्यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती.
बीड: नाथसागरातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीला पूर; नदीकाठच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गावाला वेढा पडल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी मार्गच राहणार नाही.. मुद्दामहून पाणी सोडून मारायचे का?
ज्यावेळी आम्ही पिकांसाठी पाणी मागितले.. त्यावेळी वरच्या लोकांनी म्हणायचं आमच्या हक्काचं पाणी सोडणार नाही..
आता त्यांच्या हक्काचं पाणी कुठे गेलं.. आता मारण्यासाठी पाणी सोडता का?
शंभर टक्के धरण भरल्यानंतर पाणी सोडता.. हे चुकीचे आहे..
आम्हाला विश्वासात घेऊन जायकवाडीतून पाणी सोडायला पाहिजे होतं.. अचानक पाणी सोडल्याने आम्ही घाबरून गेलो आहोत..
आधीच पाणी असल्याने आम्ही काय करायचं..
घरात वृद्ध आहेत.. अचानक पाणी आले तर आम्ही काय करायचं.. प्रशासनाने काहीही सांगितलं नाही..
आता बाहेर पडायला मार्ग नाही.. वरतून पाऊस पडतो.. अनिल गोदावरी पाणी आहे..
पाणी सोडण्याआधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं..
गोदावरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आपल्या वेदना सांगत आहेत...
शेतामध्ये पाणी आहे.. प्रशासनाचे कोण्ही नाही..
गोदावरी नदीकडच्या नागझरी गावातून आढावा...
CMO Maharashtra :
धाराशिव :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
- जिल्ह्यात 6 गावांचा संपर्क तुटला असून, 3615 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 88 घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्यास सांगण्यात आले आहे.
#Maharashtra #Marathwada #Dharashiv
CMO Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकार्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
- जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान 581.7 मि.मी. इतके आहे. आतापर्यंत 818.5 मिमी. इतका पाऊस झालेला आहे. सुमारे 68 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
- 133 पक्क्या तर 291 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.
- पैठणमधून नागरिकांना शाळा, मंगल कार्यालये येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
#Maharashtra #Marathwada #ChhatrapatiSambhajinagar
भिवंडी
Anc:- भिवंडी शहर आणि ग्रामीण भा गात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कामवारी नदीची पातळी धोक्याजवळ पोहोचली असून तिचे पाणी आता शहरात सीरण्यास सुरुवात झाली आहे.
तीन बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढताच बाजारपेठ व आसपासच्या भागात पाणी आणखीनच शिरले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना आपली भाजी व दुकाने वाचवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातूनच मार्ग काढत घरच्या दिशेने परतावे लागले. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Wkt अनिल वर्मा
नांदेड तालुक्यातील राहेगाव परिसरात गोदावरी नदीने रौद्ररूप घेतले आहे. पुराच्या पाण्यामुळे परिसर वेढा आला असून, एसडीआरएफ टीम, महसूल प्रशासन आणि आरोग्य पथकासह शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर मदतीसाठी पोहोचले आहेत. राहतांना मदत व बचावकार्य सुरु असून आवश्यक मदत पुरविण्यात येत आहे
पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकाजवळ मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे अचानक वेगळे झाले. सुदैवाने या घटनेत मोठा अपघात टाळला गेला, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणाने डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला असून वाहतूक सुमारे चाळीस मिनिटे ठप्प झाली आहे.
राज्यातील पावसाचा जोर कमी होणार
राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित
पुढील २४ तासांत हे आणखी कमजोर होणार, अशात राज्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात
दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिमेकडे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाईल
१ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनाऱ्याजवळ ईशान्य अरबी समुद्रात पोहोचण्याचा अंदाज
मुंबईच्या मालाड पूर्वेत पठाण वाडी मध्ये गोळीबार झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे
प्रॉपर्टीच्या वादातून मित्राने केली मित्रावर गोळीबार
एक ते दोन राऊंड गोळीबार करण्यात आली
या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत
गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला असून कुरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत...
गडचिरोली : शनिवारी छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढले आहे. परिणामी गुरुवारनंतर पुन्हा एकदा आल्लापल्ली-भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने यावर्षी पाचव्यांदा संपर्क तुटला होता. तर आज रविवारी सकाळी पुन्हा पुलावर पाणी चढल्याने दोन दिवसानंतर पुन्हा एकदा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाचा परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्यातील नागरिकांना बसला आहे. वाहतूक बंद झाल्याने भामरागड येथे महामंडळाच्या अनेक बसगाड्या, खासगी वाहने अडकले आहेत.
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं (Mumbai Dam Water storage) सध्या काठोकाठ भरली असून, एकूण साठा 99.46 टक्के इतका झाला आहे. मागील 24 तासांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची (Heavy Rain) नोंद झाली असून, यामुळे आगामी काळात मुंबईकरांना (Mumbai News) पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मागील 24 तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात किती पाऊस?
——-
वैतरणा - 96 मिमी
तानसा - 62 मिमी
विहार - 95 मिमी
तुलसी - 106 मिमी
अप्पर वैतरणा - 72 मिमी
भातसा - 58 मिमी
मध्य वैतरणा - 79 मिमी
नाशिक: नाशिकच्या मनमाड, येवला नांदगाव परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कांदा, मका, बाजरी, भुईमूग या खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, तर फळबागा, भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला असून, जनावरांचा चाराही भिजल्याने चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.दिवाळी दसरा कसा साजरा करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.. शेतात सर्वत्र गुडघाभर पाणी साचले आहे...
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९.४६ टक्के पाणीसाठा
मोडकसागर, विहार, तुलसी धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा
अप्पर वैतरणात ९९.५८ टक्के, तानसा ९९.९१ टक्के, भातसा ९९.३५ टक्के तर मध्य वैतरणात ९८.९६ टक्के पाणीसाठा
मागील २४ तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड,कांदिवली बोरिवली,दहिसर,विलेपार्ले,सांताक्रुझ,वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे
जर असच जोरदार पाऊस काही वेळ पश्चिम उपनगरात सुरू राहिला तर सखल भागात पाणी भरायला सुरुवात होणार आहे....
पीएमआरडीएचा डीपी रद्द, राज्य शासनाने काढली अधिसूचना
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा (डीपी) वादग्रस्त ठरलेला असताना आज राज्य सरकारने हा विकास आराखडा रद्द केला
विकास आराखडा रद्द झाल्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेला देणार का ? याकडे लक्ष
पीएमआरडीने हा डीपी तयार करण्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीला तब्बल ४० कोटी रुपये दिले होते
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांसह सात नगर परिषदा आणि ८४२ गावांचा समावेश करून तेथील नियोजनबद्ध विकासासाठी २०१५ मध्ये पीएमआरडीएची स्थापन करण्यात आली
त्यानंतर पीएमआरडीएला डीपी तयार करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली
धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका
जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड
130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान
तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचे आगमन
कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर
पूर आल्याने शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी
मंदिरातील पुजारीसह सहा जण आणि तीन लहान मुले अडकली
पुरातून बाहेर काढण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक दिलीप गिरी यांची मदतीची मागणी
पश्चिम रेल्वे वर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका.
चक्क एसी लोकलमध्ये पावसाचे पाणी.
एडवोकेट आशिष राय यांच्याकडून ऐसी लोकलमधील पावसाचे पाणी गळण्याचा व्हिडिओ पोस्ट
पश्चिम रेल्वे वरील रात्री अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या AC लोकलमधील प्रकार.
Buldhan Crime: बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या करण्याची घटना रात्री घडली. या मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतक 1. महादेव त्रबक चोपडे, वय 70 वर्ष व सौ कलावती महादेव चोपडे वय 65 वर्ष असं मृतक आई वडिलांच नावं असून मुलगा गणेश महादेव चोपडे याने दोघांची धारदार शास्त्राने हत्या केली आहे.
यातील मृतक आई वडील आणि आरोपी मुलगा यांच्यात जमिनीच्या विक्री करण्यावरून वाद झाला व या वादातुन मुलाने आपल्या जन्मदात्यानाच संपवून टाकल आहे. अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी आरोपी गणेश चोपडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले
तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींचा निधी देण्यात येणार
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप केले जाणार
महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली जनावरे अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीचा ही संस्थांकडून नियोजन
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत करणार मदत
- अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद
- शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद
- अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक बंद झालीय
- आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे
- अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद
- शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद
- अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक बंद झालीय
- आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे
- अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद
- शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद
- अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक बंद झालीय
- आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे
वैजापूर तालुक्यातील दोन ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येणार आहे गाड्या तिकडे रवाना करण्यात आले आहेत
१. बाबुळगाव खुर्द- 14ते 15 लोक अडकल्याची शक्यता आहे.
2. भिवगाव येथे 10 लोकं अंदाजित
खुलताबाद तालुका:
बाजार सावंगी या गावात दहा ते पंधरा लोक अडकल्याची माहिती
दोन्हीकडे दोन वेगवेगळे शोध व बचाव पथके आवश्यक साहित्य पाठविण्यात आली आहेत
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरू आहे
पहाटेपासून पश्चिम उपनगरात पावसाच्या जोर कमी असल्यामुळे सखल भागात पाणी भरलं नाही...
हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला महापूर आल्याचा पाहायला मिळते आहे कळमनुरी तालुक्यातील कोंढुर गावामध्ये पाणी शिरल्याने सगळीकडे दानादान उडाली आहे.
मुसळधार पावसामुळे धारशिव जिल्ह्यातील ३ हजार ६१५ लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. पावसाचा अलर्ट आणि पूर परिस्थितीच्या धोक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान
मांजरा, तेरणा, दुधना नद्यांना पूर आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे.. तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे पाडळीतील नागरिकांचं जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आलंय.
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.