Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Live Updates: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात...More
Nagpur Rain
तीन दिवसाच्या खंडानंतर नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे..
सकाळपासून शहरात सर्वत्र ऊन असताना दुपारी चार नंतर ढग दाटून आले आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली... तत्पूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत दमट हवामानामुळे नागपूरकरांच्या घामाच्या धारा वाहत होत्या...
दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आज येलो अलर्ट जारी केला होता.. तर उद्या गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सोलापूर ब्रेकिंग
---
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं
सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीत जाऊन या लोकांची सुटका केली
मागील काही तासापासून हे दोघे एका पेट्रोलपम्पवर अडकून होते
मात्र बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका केलीय
सोलापूर जिल्हा मध्ये आलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून बचाव पथक आलं आहे
हत्तूर गावात या पथकाने 10 लोकांची आणि काही जाणवरंची देखील सुटका केलीय
Anc: कालपासून बीड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचे ओसरले आहे. आता त्यानंतर या पुराची भीषणता समोर आली. अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती साहित्य वाहून गेल्याच समोर आलं. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई गावातून वाहणाऱ्या अमृता नदीला पूर आला होता. आणि याच पुराने नदीकाठच्या परिसरात मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. या क्षेत्रातील संपूर्ण उसाचे पीक आडवं झालंय. दरम्यान पुराचे पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने...
शिवाजीराव सावंत सरांचे गंभीर
माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांचे सीन कोळेगाव धरण प्रशासनावर गंभीर आरोप
अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
सीन कोळेगाव धरण प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळं सीना नदीला महापूर
अधिकाऱ्यांनी अतिवृष्टी होईपर्यंत पाणी सोडण्याची वाट पाहीली, त्यानंतर पाणी सोडले
धरण 80 ते 90 टक्के भरल्यावर पाणी सोडणं गरजेचं होतं.
शिवाजीराव सावंत यांचे वाकाव गाव पूर्ण पाण्याखाली गेलं आहे.
लोकेशन - वाकाव (माढा)
लातूर ब्रेक
लातूर जिल्ह्यातील उजनी येथे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली . त्यानंतर गावकऱ्यांना संबोधित करत असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना मदत केली जाईल अशी घोषणा केली त्यानंतर काही गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संबोधनादरम्यान गोंधळ घातला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना राजकारण करू नका असं सुनावलं... एका वृद्ध शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची पेढी दाखवायला आणली व मुख्यमंत्र्यांनी ती स्वीकारली.
जोरदार पावसाने हिंगोली जिल्ह्यातील पिकांचा अतोनात नुकसान झालेला आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील पीक सुद्धा वाहून गेली आहेत या संदर्भात पीक विमा कंपनीकडून कोणती दखल घेतली जात नसताना आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हिंगोली शहरातील या पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेले असता विमा कंपनीचे प्रतिनिधी या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना उडवाउडूची उत्तर देत होते त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्यांची तोडफोड केली आहे.
परभणी सेलू तालुक्यात दुधनेच्या पुराने आणि पावसाने प्रचंड नुकसान
सोयाबीन मधील पाणी पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर
मायबाप सरकारने भरीव मदत द्यावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांच म्हणणे
परभणी जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व असा पाऊस आणि नद्यांना पूर आलाय यामुळे शेत शिवार अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत आणि सोयाबीन कापूस असलेल्या शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे शेतकऱ्यांना पिकवलेल्या पिकांमध्ये पाणी पाहून अश्रू अनावर होत आहेत.
लातूर: गेल्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात अतिवृष्टी होत आहे आणि यामुळे तेरणा नदीला आलेल्या महापुरामुळे उजनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे शाळेच्या इमारतीसह साहित्याचे व पोषण आहाराचे मोठे नुकसान झाल्याने गेल्या चार दिवसांपासून ही शाळा बंद आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचेही महापुरामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या उजनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देणार आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परांडा तालुक्यातील रुई भागातील पाहणी दौरा रद्द
कारंजा आणि देवळाई भागातील नुकसानीची पाहणी करणार
नियोजित दौऱ्याप्रमाणे रुई येथील नुकसानीची पाहणी
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी वाशिम जिल्ह्याला 145 कोटी रुपये मंजूर.
वाशिम जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन तब्बल 1लाख 69 हजार 284 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी सरकारकडून काल 145 कोटी 35 लाख 43 हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील दोन लाख 1 हजार 824 शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे.
मात्र, शेतकऱ्यांना 8हजार 500 रुपये प्रमाणे केवळ 2 हेक्टरची मर्यादा ठेवून मदत दिली जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
बीड: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बीडमध्ये दाखल झाले असून बीड, शिरूर, पाटोदा, माजलगाव, परळी तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शिंदे दिवसभर पाहणी करणार आहेत. शशिकांत शिंदे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात पुरात वाहून गेलेल्या आदित्य कळसाने यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट देऊन शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्याला सुरुवात होतेय. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा, नागझरी, शिरापूर या गावात अतिवृष्टी ग्रस्त पिकांची पाहणी करून शिंदे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांचा दौरा सुरू असताना विरोधी पक्षातील नेते देखील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचतायत..
मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर यांना भाजप कडून पुन्हा वेटिंग वर?
कोंकणातील मनसेच नेते वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून काही दिवसांपूर्वी बडतर्फ करण्यात आले होते
त्यानंतर ते भाजप मध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा आहेत
मंगळवारी तर वैभव खेडेकर जाहिरातबाजी बॅनरबाजी करत कोंकणातून थेट मुंबईत भाजप प्रदेशकार्यालयात पक्ष प्रवेशसाठी दाखल ही झाले होते
गाड्यांच्या ताफ्यासह खेडेकर आले पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा अडली, या गाडीला भाजप हिरवा कंदील दाखविणार का ?
मात्र पक्ष प्रवेश न मिळालेल्या वैभव खेडेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आहे
मेरा पाणी उतरता देख मेर किनारे घर मत बस लेना, मे समुंदर हू लौटकर जरूर आउंगा
धाराशिवमध्ये पुराचा आणखी एक बळी
धाराशिवच्या भूम तालुक्यातील देवळालीत पुराच्या पाण्यात वाहून एकाचा मृत्यू
गणेश दगडू तांबे असं मृत तरुणाचं नाव
साठवण तलावातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू
देवळाली येथे रात्री आलेल्या पुरामध्ये एक बांधव पाण्यात पडून वाहून गेला.
रात्रीपासून त्याची शोध मोहीम गावातील तरुण करत होते. पण त्याचा कुठेच पत्ता लागत नाही..
पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव गणेश दगडू तांबे राहणार देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव.
अंदाजे वय 35 ते 40 आहे तांबेवाडी साठवण तलाव या ठिकाणी पाण्याचा संपूर्ण फ्लो आला. त्यात वाहून गेल्याने मृत्यू .
आर्थिकदृष्ट्या असहाय्य असलेल्या महिलांना हेरून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना भंडाऱ्यात अटक करण्यात आली. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात दहशतवाद विरोधी पथकानं टाकलेल्या छाप्यात एका महिलेची सुटका करून दोघांना अटक केली. पवनीच्या इटगावं - कुर्झा मार्गावर असलेल्या एका लॉजवर हा वेश्या व्यवसाय चालायचा. याची माहिती मिळाल्यानंतर तिथं छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. अजय नागेश्वर (26) लॉज मालक व्यंकटेश बागडे (46) या दोघांना अटक करताना तिथे आढळलेली महिलेची सुटका करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकानं वेश्या व्यवसायावर केलेली एकाचं आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी तुमसर इथं केलेल्या कारवाईत एका महिलेची सुटका करताना दोघांना अटक केली होती
पिंपरी चिंचवड मध्ये एका बांधकाम साईटवर एक आर एम सी ट्रक पलटी झाल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हयरल होत आहे. आर एम सी ट्रक चालकाला बांधकाम स्थळाचा अंदाज न आल्याने आर एम सी ट्रक एका निर्मानाधीन इमारतीच्या बेसमेंट मध्ये पलटी झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुदैवाने या अपघातात आर एम सी ट्रक चालकाचा जीव थोडक्यात वाचला आहे. हा व्हिडिओ रावेत परिसरातील एका बांधकाम साईटचं असल्याचं बोललं जातंय मात्र या अपघाता विषयी अजून रावेत पोलिसांकडे कोणतीही नोंद अजून पर्यंत झालेली नाही.
Nagpur News : अतिवृष्टीमुळे आलेल्या बुरशी रोगामुळे संत्रा व मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. तसेच सोयाबीनवर येलो मोजक रोगामुळे पीक पूर्णपणे उध्वस्त होत आहे. स्वतः बांधावर जाऊन अनिल देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. परंतु संत्रा व मोसंबीच्या फळगळीचे तसेच येलो मोजकमुळे होत असलेल्या सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले नाही. नुकसान होऊनही पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी अनील देशमुख यांनी केली.
बीड: बीड जवळील नायगाव घाटामध्ये एसटी बस आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. पाटोदा तालुक्यातील आशिष राख या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात एवढा भीषण होता ज्यात एसटी बसचा पुढील भाग आणि चार चाकी वाहन चक्काचूर झाले आहे. दरम्यान यातील दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. घाटामध्ये ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
Rain News : मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी कोपली असल्याचे चित्र मागच्या २ दिवसांपासून कायम आहे.पाथरी सोनपेठ मानवत गंगाखेड पालम पूर्णा या ६ तालुक्यात गोदावरीच्या पुराचा फटका बसलाय आज दुसऱ्या दिवशीही २५ गावांचा संपर्क तुटलाय मोठ्या प्रमाणावर गोदावरीला पाणी आलेले आहे त्यामुळे गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे लाखो हेक्टर वरील शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याच्या परिसरातून ड्रोन ने घेतलेले गोदावरीच रूप
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद
सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहणांच्या लांबचं लांब रांगा
दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद
उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावर वाहतूक बंद करण्यात आलीय
सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता
धाराशिव मध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून आतापर्यंत 182 लोकांचे रेस्क्यू
तर आर्मी कडून जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू
धाराशिव सह बीड सोलापूर अहमदनगर या भागात इंडियन पथकाकडून मोठ्या प्रमाणात लोकांचे रेस्क्यू
एनडीआरएफकडून कुठे किती लोकांचे रेस्क्यू ?
धाराशिव: 182
बीड: 39
सोलापूर: 82
अहिल्यानगर: 17
एनडीआरएफकडून देण्यात आलेली उशिरापर्यंतची ही आकडेवारी आहे
सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह दृश्य
मोहोळच्या अर्जुनसोंड गावातल्या पांढरे वस्तीतील अनेक घरे पाण्याखाली
पांढरे वस्तीतील भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेरात कैद
अनेक घरे, जनावरे अक्षरशः पाण्याखाली
एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी घेतलेले चित्रीकरण
मोहोळ तालुक्यातील अत्यंत विदारक परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद
सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहणांच्या लांबचं लांब रांगा
दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद
उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावर वाहतूक बंद करण्यात आलीय
सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद