Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्, एका क्लिकवर

Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाण Last Updated: 06 Oct 2025 01:58 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates: आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार ह्या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर...More

सप्तश्रुंगगडावर भरला किन्नरांचा मेळा; देशभरातील किन्नरांनी लावली हजेरी 

नाशिक : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीय पंथीयांच्या छबीना मिरवणुकीला विशेष महत्व असल्याने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देशभरातील तृतीय पंथीयांनी हजेरी लावली. गेली ८० वर्षांपासून उत्सवाचे खास आकर्षण आकर्षण ठरते ते छबीना मिरवणूक. किन्नर व त्यांचे गुरु त्यांच्या देव्हाऱ्यातील देवीच्या प्रतिमा व मृर्ती घेवून येतात. सप्तशृंगी गडावरील शिवालय तळ्यावर शाही स्नान घालून साडी, चोळी, अंतर, वेणी व शृंगाराचे साहित्याने देवीला सजवित देवीचा छबिना पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशा या वाद्याचा गजरात मिरवणूक काढतात. हा छबीना शिवालय तळ्यावरून तर गडाच्या पहिल्या पायरी पर्यंत निघते. हा सोहळा पहाण्यासाठी लाखो भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात.