Maharashtra Weather Update : वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे (Western Dirstbans) देशासह (India Weather) राज्यातील हवामानावर (Maharashtra Weather Forecast) परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत राज्याच्या हवामानात (Maharashtra Weather News) मोठा बदल होऊन अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात 23 आणि 24 नोव्हेंबरला कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तर, त्यानंतर वातावरणावर परिणाम होऊन पावसाचा अंदाज आहे.
काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (Indian Metrology Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज काही तुरळक ठिकाणी पावसाची हलकी रिमझिम होऊ शकते. 24 नोव्हेंबर रोजी कोकण, गोवा किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 24 आणि 25 नोव्हेंबरला राज्यात विविध ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल झाला आहे. यामुळे देशासह अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीपमध्येही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज
24 आणि 25 नोव्हेंबरला गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील दोन दिवस कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत पहाटे गारवा पाहायला मिळेल आणि कोरडं वातावरण असेल. पुढील 48 तासांत राज्यासह देशातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होईल.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
23 नोव्हेंबरपर्यंत - राज्यभरात कोरडं हवामान
24 नोव्हेंबर - कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस
25 नोव्हेंबर – राज्यभरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस
महत्त्वाच्या इतर बातम्या :