Rain Updatesदडी मारुन बसलेला पाऊस जून महिना संपताना महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. पुढील 3- 4  दिवस  कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. 






यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊसाची हजेरी 


यंदा मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसानंतर आज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह यवतमाळ तालुक्यात पावसाने  हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस कोसळल्याने पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वेळेतच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी खुश झाले होते. परंतु, मान्सूनचा पाऊस चांगलाच लांबला. शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीला म्हणावी त्या प्रमाणात सुरुवात केली नाही.आताच्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून, आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.