Maharashtra weather update: राज्यभरात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचे राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे .हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विविध भागात पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत . केरळ ते दक्षिण गुजरात या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनच्या ढगांचे पट्टे दिसून येत आहेत .त्यामुळे पुढील तीन ते चार तासात परभणी, नांदेड मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे .तसेच मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

 

मराठवाड्यातील 65 महसूल मंडळात अतिवृष्टी

गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 65 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे .सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यातील 33 मंडळात पडलाय .छत्रपती संभाजीनगर, जालना ,नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली . वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे .पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात दाणादाण उडवली असून नदी - नाले दुथडी भरून वाहत आहेत . नांदेड जिल्ह्यात (mm) कंधार-31 किनवट-44 देगलूर-39.4 उमरी-47 हदगाव-52 हिमायतनगर-61 माहूर-55 मुदखेड-30 अर्धापूर-45 धर्माबाद-24 नायगाव-18 मुखेड-04-33 मी. मी पाऊस झाला.

पावसाची रिपरिप वाढली

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे . मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता किनारपट्टी भाग उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात जोरदार पाऊस होत आहे . आज तळ कोकणासह कोल्हापूर सातारापुणे घाट परिसरातपावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत .संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट आहे .मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार असून मुंबई,  ठाणे भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे .गेल्या काही दिवसात दडी मारलेल्या पावसाने बीडच्या माजलगाव परिसरात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरूअसतानाच 9 च्या सुमारास सुरू झालेला पाऊस पुढे तासभर बरसत होता. मान्सूनपूर्व पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्याकडून माजलगावात केवळ 33 टक्केच खरीपाची पेरणी करण्यात आली होती.पाऊस नसल्याने  शेतकरी उर्वरित पेरणीसाठी धजावत नसताना आज पडलेल्या पावसामुळे आता खरिपाच्या पेरणीच्या कामाला गती मिळणार आहे.

किनारपट्टी भागात समुद्राला आले उधाण !

गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे व इतर किनारपट्टी भागात समुद्राला उधाण आले आहे .अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर किनारपट्टीवर रौद्ररूप घेतले आहे .मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागात जोरदार पाऊस होणार आहे .

हेही वाचा: