Maharashtra Rain : गेल्या तीन ते चार दिवसात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाल्याचं पाहायला मिळालं. काही भागात तर पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, आजपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरायला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागांन दिला आहे. जाणून घेभयात आज कसं असेल हवामान.
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
कोकण विभागासाठी यलो अलर्ट
ठाणे
मुंबई
रायगड
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
मध्य महाराष्ट्रतही यलो अलर्ट
जळगाव
नाशिक
अहिल्यानगर
पुणे
सातारा
सोलापूर
कोल्हापूर नाशिक घाट माथ्यावर
मराठवाडा यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर
जालना
परभणी
बीड
हिंगोली
नांदेड
लातूर
धाराशिव
विदर्भ यलो अलर्ट
अकोला
अमरावती
नागपूर
वर्धा
वाशिम
यवतमाळ
तर भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून छत्तीसगड ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून प्रवास करत आहे .येत्या तीन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे .29 मे ते दोन जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यात काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. पण बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप असणार आहे. मुंबईसह पुण्यात आता पुढील चार दिवस पावसाची ओढ कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान केंद्राने दिलाय. आज तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून विदर्भात आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे. उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचंही IMDनं सांगितलं .
दरम्यान, तळकोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर हळूहळू राज्याच्या सर्व भागात दाखल होत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुससार राज्याच्या विविध बागात पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अतिवृष्टी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. नद्यांच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं काही भागात वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. केळी, आंबा यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या: