Maharashtra Rain : आज संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं (IMD) दिली आहे. 


मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं राज्याच चांगल्या पावसाचा अंदाज


आजपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात दोणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. तर 17 आणि 18 तारखेला गुजरात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भाच्या जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता


नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणसमूहात जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन (25 ते 30 सप्टेंबर आणि 9 ते 13 ऑक्टोबर) आवर्तनातून चांगला पाऊस अपेक्षित आहे. 


खरीपाच्या पिकांना चांगल्या पावसाची गरज


राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं आजपासून राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rain News : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती, पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण