Maharashtra Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, आत्ताची स्थिती जाणून घ्या
पुढील दोन दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात...More
गडचिरोली जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल
1. वैनगंगा नदी :
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 29 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 3412 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे.
वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 7866 क्युमेक्स आहे.
इटियाडोह प्रकल्प - 72.23% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक
नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
2. वर्धा नदी :
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 3 गेट उघडलेले असुन विसर्ग 84 क्युमेक्स आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
3. प्राणहिता नदी :
दिना प्रकल्प – 97.11% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक
प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
4. गोदावरी नदी :
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 24 गेट उघडलेले असुन विसर्ग 5643 क्युमेक्स (1,99,300 क्युसेक्स) आहे.
गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
5. इंद्रावती नदी :
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी 8.30 वाजताच्या नोंदीनुसार पूलाच्या 2.95 मी. ने खाली आहे.