Maharashtra Rain Update : अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका

Maharashtra Rain Update : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी सुरु असलेल्या पावसाची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगवर. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Sep 2021 08:28 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टहवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात...More

अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका

अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे.