Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Sep 2021 01:02 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain LIVE Update : उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांत पावसाचं रौद्ररूप पहायला मिळत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला...More

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर  वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.