Maharashtra Rain LIVE Updates : राज्यभरात पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग; पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Rain LIVE Updates : रायगड, रत्नागिरी पुणे साताऱ्याला रेड, मुंबई ठाणे आणि पालघर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, राज्यभर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Aug 2022 05:57 PM
वाशीम जिल्ह्यात  जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत, अनेक गावांचा  संपर्क तुटला  

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 27.4  मी. मी पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यातील नदी काठी असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. 


वटफळ, मेंद्रा, गोस्ता, रूई, उमरा समशोद्दिन, तोंडगाव, केकतउमरा,  रिठद,  अमानावाडी खेर्डा  बोरी वारा,  जहागीर , सावली   या  सर्व गावांचा काही काळ संपर्क तुटला  होता.  प्रशासनाने  या सर्व गावांना  धोक्याचा इशारा दिला असून वाहत्या पाण्यातून प्रवास करू नये अशा सूचना दिल्या आहेत.  पावसाने  शेकडो एकर पिकांचं नुकसान झालं आहे. 

Aurangabad: जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले, 10 दरवाज्यातून 5 हजाराने विसर्ग

Aurangabad News: जायकवाडी धरणात येणारी आवक घटल्याने गेल्या आठवड्यात बंद करण्यात आलेले जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान एकूण 10 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले असून, त्यातून एकूण 5 हजार 240  क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर सोबतच जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक असा विसर्ग सरू असल्याने सद्या जायकवाडीतून एकूण 6 हजार 829 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागाला कोणता अलर्ट?
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

कोणत्या भागाला कोणता अलर्ट?

 

कोकण

 

रेड अलर्ट : पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 

 

ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग 

 

मध्य महाराष्ट्र 

 

रेड अलर्ट : पुणे, कोल्हापूर, सातारातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 

 

ऑरेंज अलर्ट : नाशिकमधील घाट परिसरात अतिमुसळधारेचा इशारा 

 

यलो अलर्ट : नंदुरबारमधील घाट परिसरात मुसळधार, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार 

 

मराठवाडा

 

ऑरेंज अलर्ट : नांदेड, हिंगोली, परभणी 

 

यलो अलर्ट : जालना, बीड, लातूर 

 

विदर्भ 

 

रेड अलर्ट : गडचिरोलीत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 

 

ऑरेंज अलर्ट : भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर 

 

यलो अलर्ट : अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा काटेपूर्णा धरणाचे दहाही दरवाजे दोन फुटांनी उघडले

Akola Katepurna Dam : अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महान येथील काटेपूर्णा धरणाचे दहाही दरवाजे दोन फुटांनी उघडले आहेत. प्रकल्पातून 442 घनसेंटीमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..

मुंबई-गोवा महामार्गावर लांज्यातील अंजणारी पुलावरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात आता सर्व दूर पावसाने धुंवाधार बॅटिंग केली आहे. त्यामुळे इथले नदी, ओहळ ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी नदीकाठच्या शिवारात आणि लोकवस्तीत देखील शिरत आहे. लांजा, रत्नागिरी, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे असलेल्या अंजणारी पुलावरील वाहतूक जड वाहनांसाठी सध्याच्या घडीला बंद करण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांना या ठिकाणावरुन पुढे जाण्यास परवानगी आहे. काजळी नदी सध्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Vidarbha Rain Update : पुढील 48 तास चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

पुढील 48 तास चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, वर्धा ,भंडारा, अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भावर पुढील 4 ते 5 दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे... गेल्या 24 तासात विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेले आहे. हवामान विभागाच्या पूर्व विदर्भातील 23 स्टेशनमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गडचिरोलीतील मुलचेरा येथे अत्यंत जास्त म्हणजेच  156 MM पावसाची नोंद तासात झाली आहे.. नागपूर विमानतळावरील हवामान विभागाच्या केंद्रामध्येही गेल्या 24 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी : रघुवीर घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक बंद

रघुवीर घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. संततधार पावसामुळे वाहतूक सुरळीत करण्यास वेळ लागणार आहे.





Mumbai Rain Update : दादर शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळलं

Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ब्रेक, सकाळपासून उघडीप 

Nashik Rain : नाशिकमध्ये काल सायंकाळपासून सुरु मुसळधार पावसाने नाशिक शहराला झोडपून काढले. काल सायंकाळनंतर आलेल्या पावसानं गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आणि स्थानिकांची तसंच पर्यटकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. नदीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं गोदाकाठी उभी असणारी वाहनं नदीच्या प्रवाहात अक्षरशः वाहून जाताना दिसली होती, नदीचं पाणी अचानक वाढल्यानं वाहनचालकांना गाड्यांपर्यंत पोहोचणंही अवघड झालं होतं.. दरम्यान पहाटेपासून पावसाने उघडीप दिली असून जनजीवन पूर्व पदावर आले आहे. 

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा जोर मंदावला, लोकल सेवा सुरुळीत

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची क्षणभर विश्रांती

Mumbai Rain Updates : मुंबईत काल संध्याकाळपासून पहाटे साडेसहा वाजेपर्यंत रिमझीम पाऊस सूरू होता. मुंबईत पाणी कुठेही साचलं नाही. सध्या मुंबईत पाऊस थांबला आहे, मात्र ढगाळ वातावरण आहे. रेल्वे वाहतूक सर्व सुरळीत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने, पश्चिम आणि पूर्व  द्रुतगती मार्गावर चाकरमनी कार्यालयात जायला निघाल्याने, गाड्या जास्त असल्याने वाहतूक काही प्रमाणात संथ गतीने आहे. 

Sangli Rain Updates : सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, जिल्हाभर संततधार तर चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
Sangli Rain Updates : सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळपासून जिल्हाभर संततधार सुरू असून दुसरीकडे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे  धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असून धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे धरणाच्या वीजगहातुन वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय. सध्या चांदोली धरणाच्या वीजगृहातून 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणानदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.


 

दुसरीकडे या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अजून फारशी वाढ झालेली नसून कृष्णा नदी अजून पात्रामधूनच वाहत आहे. चांदोली परीसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून आज रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ तासात 17 मीलीमीटर तर आज अखेर 1405 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. या पावसामुळे धरणाची पाणी पातळीही झपाट्याने वाढत आहे. 

Chiplun Rain Updates : मुसळधार पावसानं चिपळूणात चौपदरीकरणातील रस्ता खचला, एकेरी वाहतूक सुरु

Chiplun Rain Updates : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील काँक्रिटीकरणाला तडे गेल्याचे समोर आलेले असतानाच रविवारी झालेल्या मुसळधार पावसात पेढे-सवतसडा धबधब्यासमोरच रस्त्याच्या एका बाजूचा भराव ढासळला आहे.या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून डागडुजीचे  काम हाती घेण्यात आले आहे. तूर्तास येथे एकेरी वाहतूक सुरू ठेवलेली आहे.




Sindhudurg Rains : तळकोकणात सलग चौथ्या दिवशीही पावसाची संततधार, आजही यलो अलर्ट

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदया दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवलेला असून मच्छीमारानी मासेमारी साठी समुद्रात जाऊ नये असं आव्हाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2170 मिमी पाऊस झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पा मध्ये 367.253 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.09 टक्के भरले आहे. 

Wardha Rain Updates : वर्धा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब

Wardha Rain Updates : वर्धा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. पुन्हा नदी नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. कौंडण्यपूर येथे वर्धा नदीवरुन पाणी असल्याने आर्वी देऊरवाडा रस्ता बंद. बोरचे 9 दरवाजे उघडणार, नजीकच्या घरांना सतर्कतेचा इशारा. प्रकल्पात आवक वाढल्यानं सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे 9 दरवाजे 30 सेंमीने आज 8 आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उघडण्यात येणार असून 172 घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Washim Rain Updates : वाशिम रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस

वाशिम रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाचा सुरु आहे. काही भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून आता पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Updates : पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कांदाट खोऱ्यात रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली

Maharashtra Rain Updates : पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कांदाट खोऱ्यात रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली असून, प्रशासकीय यंत्रणेनं लवकर दरड हटवावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. 

Akola Rain Updates : अकोला जिल्ह्यात रविवारी रात्रभर रिमझिम पाऊस

अकोला जिल्ह्यात रविवारी रात्रभर रिमझिम पाऊस होता. सध्या पाऊस बंद असला तरी जिल्हाभरात पावसाचं ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभरात चांगला पाऊस होण्याची चिन्ह आहेत. जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा हे लघुप्रकल्प 100 टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा काटेपुर्णा प्रकल्प 90 टक्क्यांच्या आसपास भरलाय. यासोबतच जिल्ह्यातील वाण प्रकल्पसाह इतरही प्रकल्प 90 टक्के भरले आहेत.

Yavatmal Rain Updates : यवतमाळ जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Yavatmal Rain Updates : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पेरणी केलेलं पीक पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हताश.

Belgaum Flood : बेळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस

Belgaum Flood : बेळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुसऱ्यांदा केलेली भात शेती पुन्हा पाण्याखाली गेलीय. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील सहन करावा लागतोय. 

Buldhana Rain Updates : बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. तर इतर सर्वत्र तुरळक पाऊसाची रिमझिम सुरु आहे.

Parbhani Rain Updates : अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा परभणीत पुन्हा जोरदार पाऊस

Parbhani Rain Updates :  अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा परभणीत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. परभणी शहरासह,जिंतूर,पाथरी,पुर्णा,सेलू तालुक्यात जोरदार पाऊस. यंदा परभणी जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस पडत असल्याने सोयाबीन, कापूस,तूर,मूग आदी पीक चांगल्या रीतीने बहरली. 

Nanded Rain Updates : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका

Nanded Rain Updates : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका. सालेगावच्या नदीवरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांना फटका. नदीवर नवीन पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी 

Nanded Rain Updates : दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाची पुन्हा दमदार सुरुवात

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. दरम्यान रविवारपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मांजरा, पैनगंगा, मन्याड ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील छोटे मोठे 35 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्प ही 74 टक्के क्षमतेने भरला आहे. पावसाच्या या संतधारमुळे पुराच्या आणि अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली उर्वरित सोयाबीन, हळद, उडीद,मूग, कापूस, केळी ही पिकेही जाण्याचा मार्गावर आहेत.

Satara Rain Updates : महाबळेश्वर कोयना परिसराबरोबर साताऱ्यात मुसळधार पाऊस

Satara Rain Updates : महाबळेश्वर कोयना परिसराबरोबर साताऱ्यात मुसळधार पाऊस. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. 

Aurangabad Rain Updates : वैजापूर तालुक्यातील हिंगोनी गावात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस

औरंगाबादमध्ये वैजापूर तालुक्यातील हिंगोनी गावात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या नाले तुडंब भरले आहेत. शेतात अजूनही पाणी साचलं असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कुडाळमधील निर्मला नदीला पूर, 27 गावांचा संपर्क तुटला

Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्यानं ब्रिटिश कालीन आंबेरी पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. 

Amravati Rain News : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात मुसळधार पाऊस

Amravati Rain News : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान तर अनेक गावातील सखल भागात पाणी शिरलं. दरम्यान कपीलेश्वर मंदिरला लागून असलेल्या नदीला पूर आल्यानं यात जनावरे देखील वाहून गेल्याची शक्यता.  

Mumbai Rain Updates : मुंबईसह पालघर, ठाण्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain Updates : मुंबईसह पालघर, ठाण्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीची शक्यता. पुढील तीन दिवस 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता. 

Kolhapur Rail Updates : करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद

Kolhapur Rail Updates : कोल्हापुरात करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. गगनबावडा येथे अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे. चारचाकी वाहनांची वाहतूक मात्र सुरू आहे.

Konkan Rain Updates : कोकणात पुढील तीन दिवस मुसळधारेचा इशारा

Konkan Rain Updates : कोकणात पुढील तीन दिवस मुसळधारेचा इशारा, मध्यरात्रीपासूनच पावसाटी बॅटिंग सुरु

Konkan Rain Updates : कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट आहे. मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यााला पावसानं पुन्हा झोडपलंय. गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रत्नागिरीच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक आहे. आणि पुढील दोन दिवस हा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसानं रघुवीर घाटात दरड कोसळली आहे. गेल्या महिन्याभरातली ही तिसरी घटना आहे.

Nashik Rain Updates : धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टहास नाशकात काही पर्यटकांच्या अंगलट

Nashik Rain Updates : पावसाचा जोर वाढला असताना देखील धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टहास नाशकात काही पर्यटकांच्या अंगलट आला.. त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या 17 पर्यटकांची मध्यरात्री सुटका करण्यात आली. तर काही पर्यटकांचा अजूनही शोध सुरुच आहे. अविनाश गरड नावाच्या पर्यटकांचा अद्याप शोध लागलेला नाही. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अचनाक पाण्याची पातळी वाढली आणि पर्यटक अडकले. त्यात मोबाईल फोनला रेंज नसल्यानं सरकारी यंत्रणांशी संपर्क होत नव्हता. मात्र सरकारी यंत्रणांना पर्यटक अडकल्याचं समजताच त्यांनी रात्री 7 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं आणि 17 पर्यटकांची सुटका केली.

Nashik Rain Updates : मुसळधार पावसानं नाशिकला झोडपलं, गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ

Nashik Rain Updates : मुसळधार पावसानं नाशिक शहर आणि  ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं. काल सायंकाळनंतर आलेल्या पावसानं गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आणि स्थानिकांची तसंच पर्यटकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. नदीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं गोदाकाठी उभी असणारी वाहनं नदीच्या प्रवाहात अक्षरशः वाहून जाताना दिसली होती, नदीचं पाणी अचानक वाढल्यानं वाहनचालकांना गाड्यांपर्यंत पोहोचणंही अवघड झालं होतं.  दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला. शेत शिवरात पाणी साचल्यानं उभ्या पिकावर रोगराई पसरण्याची भीती आहे.

Maharashtra Rain Updates : पुढील तीन दिवस राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : आजपासून 11 ऑगस्टपर्यंत राज्यातल्या अनेक भागात पावसाचं धूमशान असणार आहे. त्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रात अतीवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईतही 8 ते 10 ऑगस्टदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईत 100 मिमी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील दोन दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभर नद्यांची पातळी वाढण्याचा अंदाज असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 





पार्श्वभूमी

Maharashtra Heavy Rain Alert : काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. हवामान विभागानं (India Meteorological Department, IMD) पुढच्या 5 दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश (Flood) परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्यानं नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी 


बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. 


दरम्यान, सध्या राज्यातील विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.


विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा


विदर्भात पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मान्सूनची सक्रियता वाढल्यानं पावसाची कोसळधार 


मान्सून देशाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे आणि त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेस स्थित आहे. यासोबतच उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्रही कायम आहे. तसेच पूर्व-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्राच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 3.1 किमी आणि 5.8 किमी दरम्यान Cyclonic Circulation आहे. म्हणूनच या हवामान हालचालींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.