Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबईत वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Latur Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं खरीप पिकांना जलसमाधी मिळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल तीन तास सुरु असलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे.
Chandrabhaga River : आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी प्रशासनानं बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली आहे. मात्र, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली नाही. त्यामुळं चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) गणपती बाप्पाचं विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या ही नदी दुथडी भरुन वाहत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रेल्वेची वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तसेच पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, लातूर, परभणी आणि नांदडेमध्येही पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मुंबई ठाणे परीसरातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाचे आगमन
तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह जिल्हाभरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाभरात जोरदार अतिवृष्टी झाली. दरम्यान या दोन महिन्यात नांदेड जिल्ह्यात तब्बल 850 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली व जिल्हा भरातील छोटेमोठे 36 प्रकल्प तुडुंब भरले. पण त्यानंतर पावसाने उघडीप घेत तब्बल एक महिना दडी मारली. ज्यामुळे बहरात आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके अक्षरशः वाळून गेली. आता एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -