Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Live Updates : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Sep 2022 04:43 PM
 Ratnagiri Rain :  चिपळूणमध्ये पावसाचा जोर तर खेड, दापोलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी

 Ratnagiri Rain :  काही दिवस दडी घेतल्यालेल्या पावसाने पुन्हां तालुक्यात जोरदार हजेरी लावलेली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही गावात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चिपळूण मध्ये पावसाचा जोर तर खेड,दापोली मध्ये पावसाच्या हलक्या  सरी बरसल्या आहेत 

Jayakwadi Dam: गेल्या 41 दिवसांत जायकवाडी धरणातून 74 टीएमसी पाण्याचा विसर्ग

Jayakwadi Dam: मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरण यावर्षी जुलै महिन्याचं भरला होता. तर गेल्या 41 दिवसांत जायकवाडी धरणातून 74 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोबतच 1 जूनपासून जायकवाडी धरणात 125.70 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे या वर्षातील पाण्याची आवक आणि विसर्ग पाहता आधीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचे शक्यता आहे. धरणातून अजून पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग करण्यात येत आहे. सद्य धरणात 97.74 टक्के पाणीसाठा आहे. सोबतच 24 हजार 450 क्युसेकने पाण्याची आवक सुरु असून, 18 दरवाज्यातून 25 हजार 604 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.


 


 


 


 

अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात पहाटेपासून दाट धुक्याची चादर

Amravati Rain : अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात आज पहाटेपासून दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. काल अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात पाऊस झाला, त्यामुळं आज सकाळी-सकाळी अचलपूर-परतवाडा शहरासह ग्रामीण भागात धुक्याची चादर पाहायला मिळाली. परतवाडा शहरातील मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अनेक जणांनी या वातावरणचा आनंद घेतला.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत चांगली पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, नाशिक, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडला आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे. दरम्यान, आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपासून (8 ऑगस्ट) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


लातूर शहरासह परिसरात चांगला पाऊस


लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला आहे. शहरालगतच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर लातूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 


परळीत जोरदार पाऊस, पिकांना जीवनदान 


परळीत झालेल्या मुसळधार पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्यानं शेताततल्या उभी पिक माना टाकू लागली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.


मराठवाडा पाऊस 


गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4  सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.