Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर..

Maharashtra Rain Live : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह ठाणं परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Aug 2022 08:15 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र, पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर...More

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत धुक्याची चादर

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत धुक्याची चादर पसरली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस  दमदार आल्याने वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत. पहाटे अश्या दाट धुक्याची चादर पांघरलेल्या निसर्गाचे आणि या निसर्गरम्य वातावरणाचे दर्शन मोहाडीकरांना झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी पडणारे हे धुके लक्षात यंदा हिवाळा लवकर येऊन थंडी जोरदार पडण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.