Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुबईसह परिसरात पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात चांगला पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर नाशिक (Nahsik)...More
अहमदनगर जिल्ह्यातील मागील तीन ते चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळं पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण 100 टक्के भरलं आहे. मांडओहोळ धरण भरल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह पारनेर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सव काळात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. धरण भरल्यानं संपूर्ण पारनेर तालुक्याची तहान भागणार आहे. मांडओहळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफुट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफुट आहे. यावर्षी पळसपूर, नांदूर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळं धरण भरले आहे. मांडओहळ धरणामुळे पारनेर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच हे धरण भरल्यामुळे नगर आणि पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.