Maharashtra Rain Live Updates: मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Aug 2022 09:13 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे....More

नंदूरबार जिल्ह्यातील दरा प्रकल्प ओव्हर फ्लो





Nandurbar Rain : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच परिसरात असलेली हिरवळ आणि वनीकरण विभागाने जगवलेलं जंगल यासह विविध नैसर्गिक सौंदर्याचे उधान करणाऱ्या बाबी या परिसरात असल्यानं मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक दरा प्रकल्पाला भेट देत आहेत. मात्र, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संरक्षण यंत्रणा नसल्यानं या ठिकाणी येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असल्याचे दिसून येत आहे. धरण परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.