Maharashtra Rain Live Updates : विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, आजपासून तीन दिवस मुसळधार पावासाचा इशारा

Maharashtra Rain : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jul 2022 09:28 AM
नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार

Nagpur Rain : नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने आजही नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट दिले आहे.. काल रात्रीपासून नागपूर जिल्ह्यात सर्वदूर मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस  झाला.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे पालघर या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, वर्धा, बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.  हवामान विभागानं कालपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा व्यक्त केला आहे. दरम्यान, आणखी पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. 


राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान 


जुन महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं होते. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे. अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर  नांदेडमध्ये  तीन लाख हेक्टर तर वर्ध्यात 1 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 


अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे आठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे चार हजार हेक्टर जमिन खरडली गेली आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.