Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Aug 2022 04:10 PM
Rain News : कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Rain News : आज 10 वाजता कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार. कोयना धरणाचे दरवाजे 4 फूट 6 इंचाने उघडणार आहेत. धरणातून साधारण 32 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 98 टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक 22 हजारांपेक्षा जास्त आहे. पावसाचा जोर कमीच तरीही सतर्कता म्हणून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणासह मराठवाड्यात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणासह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, ओडिशात जनजीवन विस्कळीत

Rain News : देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. याचा सर्वाधिक फटका ओडिशातील लोकांना बसत आहे. भारतीय हवामान खात्याने मध्य प्रदेशात पावसाच्या मुसळधार अंदाज वर्तवला आहे. राजधानी भोपाळमध्ये तीन दिवसांचा दिलासा मिळाल्नंयातर शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. शुक्रवारी जबलपूर आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे. भोपाळसह मध्य प्रदेशातील 32 जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

सकळी 10 वाजता कोयना धरणातून 32 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होणार

Rain News : आज सकळी 10 वाजता कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडण्यात येणार आहेत. कोयना धरणाचे दरवाजे 4 फुट 6 इंचाने उघडण्यात येणार आहेत. धरणातून 32 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणात सध्या 98 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची आवक 22 हजारापेक्षा जास्त आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे, तरीही सतर्कता म्हणून कोयाना प्रशासनानं निर्णय घेतला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, मंबई आणि परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.