Maharashtra Rain Live Updates : नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस...
Maharashtra Rain Live : राज्यात काही ठिकाणी पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे.
Pune Rain : पुरंदर आणि बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने ओढेनाले भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळं कोरडी असणारी कऱ्हा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. नाजरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Shirdi Rain : शिर्डीत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. काल पहाटेच्या मुसळधार पावसाने अद्यापही जनजीवन विस्कळीतच आहे. अनेक भागात पाणीच पाणी आहे. तर काही भाग चिखलमय झाला आहे. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. साईनाथ हॉस्पिटल येथील रुग्णांवर साईबाबा सुपर स्पेशलीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्णत: पाणी ओसरले नसल्याने रस्त्यांवरही पाणीच पाणी आहे.
Nashik Rain : सिन्नर तालुक्याला पावसाने झोडपले आहे. देवपूर परिसरातील देव नदीवरील पूल वाहून गेला आहे. पूल ओलांडणारा ट्रक पाण्यात अडकला आहे. देवपूर वंडांगळी मार्गावर हा पूल होता. तालुक्यातील अनेक रस्ते मध्यरात्रीपर्यंत जलमय होते. सिन्नर तालुक्यातील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तालुक्याला पावसाचा फटका बसला आहे.
Maharashtra Rain News : राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडत आहे. या महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून, शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कलीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी काही नागरिक पाण्यात अडकल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत पावसानं धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर नाशिक, वर्धा या ठिकाणी देखील पावसानं हजेरी लावली आहे.
नाशिक पाऊस, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या (Nashik Rain) गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात होणार वाढ करण्याच येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळं जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकाळपासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारनंतर 6 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार आहे.
शिर्डीत जोरदार पाऊस
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात धुवाधार पाऊस झाला आहे.या पावसामुळं ओढे-नाले तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. शिर्डीतील शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आणि महावितरण कार्यालयास पाण्याचा वेढा पडला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांवरील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शिर्डीसह संगमनेर, कोपरगावसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
वाशिम जिल्ह्यात कधी पाऊस तर कधी धुक्याची चादर
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून वारवरणात चांगलाच बदल पाहायला मिळत आहे. दिवसा तापमानाचा पारा 32 अंशापर्यंत तर कधी पाऊस तर सकाळी अनेक भागात धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. वाशिम मंगरुळपिर मार्गावर दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -