Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Aug 2022 12:12 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तसेच पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातही हलका पाऊस झाला. दरम्यान,...More

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्य पावसाची सतत धार सुरूच, वाहतुकीवर परिणाम
सातपुडा डोंगर रांगांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळं सातपुड्याच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना संपर्क करणाऱ्या देवगोई घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळं मातीच्या ढीग रस्त्यावर आले आहेत.  बांधकाम विभागाकडून ढीग बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली जात आहे. मात्र, हा मलबा रस्त्याच्या बाजूला तसाच असल्यानं पावसाच्या पाण्यात ही माती पुन्हा रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या असून लवकरच रस्ता साफ करुन वाहतुकीला पूर्ण खुला करावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. तर दुसरीकडे धडगाव तालुक्याला संपर्काचा महत्वाचा असलेला चांडसैली घाटातही दरड कोसळत असल्याने वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.