Maharashtra Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत 

राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2022 07:50 PM
 बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद , मोताळा , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात दुपारी दोन वाजेपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला मोठा प्रवाह, मागील 24 तासांतील मुसळधार पावसाने धबधब्याला जोर

बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधब्याला मागील 24 तासंपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आलाय. या धबधब्याने रौद्ररूप धारण केलं असून धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालीय.


बदलापूरजवळच्या कोंडेश्वर इथं मंदिराच्या बाजूला दोन धबधबे असून दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्याला मोठा प्रवाह असतो. बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंडेश्वर धबधब्याला मोठा प्रवाह आला आहे. धबधब्याचं हे रौद्ररूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्यास संख्येनं गर्दी करतायत.  

Parbhani News : परभणीत पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी

Parbhani News : तीन दिवसांचा खंड पडल्यानंतर परभणीत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 1 तासापासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले असून छोट्या मोठ्या नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत. जिल्हाभरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुरू असलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत 

मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धीमी लोकल दहा ते 15 मिनीटांनी उशिराने धावत आहे. तर याच मार्गावरील जलद लोकल 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावर दहा मिनिटे उशिराने लोकल धावत आहे. तर वेस्टर्न मार्गावर 5 ते 10 मिनीटे लोकल उशिराने धावत आहे.  

कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, सखल भागातील रस्त्यावर पाणी 

कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर  पावसाचा जोर वाढला आहे. दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीतील आजूबाजूच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील अनेक सखल भागात पाणी शिरले. कल्याण मधील संत तुकाराम नगर, वालधुनी परिसर डोंबिवली मधील स्टेशन परिसर, नांदिवली या भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलंय.  मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय.  या मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर रुळांवर पाणी आलं होतं. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंदावलेली दिसून आली. कल्याण नगर महामार्गावरील वरप ते कांदा दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.  

बदलापूरच्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना  सतर्कतेचा इशारा

बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात गेल्या 12 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. बारवी धरणातून सध्या सात हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळे 11 पैकी 9 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. 

बदलापुरात उल्हास नदीची पाणीपातळी वाढली, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर येण्याची शक्यता 

बदलापूर शहर आणि परिसरात मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बदलापूरची उल्हास नदीची चौपाटी यामुळे पाण्याखाली गेली आहे.  


बदलापूर शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीचा प्रवाह मागील 24 तासात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढलाय. उल्हास नदीची सध्याची पाणीपातळी 15.90 मीटर इतकी झाली आहे. 16.50 मीटर ही उल्हास नदीची इशारा पातळी असून 17.50 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळं सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर जर पुढील काही तास कायम राहिला तर उल्हास नदी इशारा पातळी ओलांडू शकते, अशी माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. 

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाला सुरूवात 

नांदेड जिल्ह्यात  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तिसर्‍या दिवशी पावसाची रिपरिप सुरू झालीय. आज दुपार पासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. मात्र, या पावसामुळे वाळत आसलेल्या पिकांना आधार मिळालाय.

उल्हास नदीची पाणीपातळी वाढली!

बदलापूर शहर आणि परिसरात मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बदलापूरची उल्हास नदीची चौपाटी यामुळे पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकिनारी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना स्थलांतरित केलं जाईल, अशी माहिती सोनोने यांनी दिली आहे. 

कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले

कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती दुपारनंतर  पावसाचा जोर वाढला. दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली आजूबाजूच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील अनेक सखल भागात पाणी शिरले होते ,कल्याण मधील संत तुकाराम  नगर, वालधुनी परिसर डोंबिवली मधील स्टेशन परिसर, नांदिवली या भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसला ,या मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर रुळांवर पाणी आलं होतं त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंदावलेली दिसून आली .सध्या पाऊस थांबला असला तरी पुन्हा पावसाने जोर धरल्यास पुन्हा एकदा सखल भाग जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही 

भिवंडीत मुसळधार पाऊस, कामवारी नदीच्या पातळी वाढ 

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कामवारी नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. छत्रपती शिवाजी चौक या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले देखील अचानक वाढलेल्या या पाण्यामुळे शाळेत अडकून पडली होती. तब्बल दोन ते तीन फुटांपर्यंत परिसरात पाणी आहे. 

अकोला जिल्ह्यात पाऊस, अकोट तालुक्यातील छत्रपती शिवाजीनगर येथील विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Akola Rain : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील छत्रपती शिवाजीनगर येथील विद्यार्थ्यांना सध्या जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागत आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून या गावाशेजारुन वाहणाऱ्या बोर्डी नदीवर पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मात्र, नदीवर पुल नसल्याने विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून शाळेत जावं लागत आहे. हे विद्यार्थी वडाळी देशमुख येथील शाळेत जातात.

धुळे जिल्ह्यात जोरदर पाऊस, शेतकऱ्यांची पिकं धोक्यात

धुळे (Dhule) जिल्ह्यातही जोरदर पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळं शेती पिकं पिवळी पडत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद आणि मिरची या पिकामध्ये पाणी साचल्यानं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पवना धरणातून विसर्ग वाढवला; नागरीकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात  पाऊसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज   दुपारी 1  वा 4200क्युसेक    वाढवुन 6400 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकुण 7800 क्युसेक करण्यात येणार आहे तरी नदी तिरा कडील गावातील रहिवाशानी सतर्क रहावे.
पाणलोट क्षेत्रात पडणारा  पाऊस व धरणे येणारा येवा यांचे  प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.

पवना धरणातून विसर्ग वाढवला; नागरीकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात  पाऊसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज   दुपारी 1  वा 4200क्युसेक    वाढवुन 6400 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकुण 7800 क्युसेक करण्यात येणार आहे तरी नदी तिरा कडील गावातील रहिवाशानी सतर्क रहावे.
पाणलोट क्षेत्रात पडणारा  पाऊस व धरणे येणारा येवा यांचे  प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.

कल्याण डोंबिवलीत पावसाची जोरदार हजेरी

Kalyan-Dombivli Rain : कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पाऊस सुरू असला तरी अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळं कल्याण डोंबिवलीमधील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौक ते सदानंद चौक या रस्त्यावर देखील जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. या परिसरात शाळा व लहान मुलांचे हॉस्पिटल असल्याने पालकांना आपल्या मुलांना ज्ञान करण्यासाठी या गुडघ्याचे घर पाण्यातूनच ये जा करावी लागतेय . तर डोंबिवली मधील नांदिवली परिसरातील  रस्त्यावर देखील पाणी साचन्यास सुरुवात झाली आहे. सध्या कल्याण डोंबिवली रिमझिम पाऊस सुरू आहे.  तरी पावसाचा जोर वाढल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेण तालुक्यातील कामार्ली धरण शंभर टक्के भरलं

Raigad Rain : पेण तालुक्यातील कामार्ली धरण शंभर टक्के भरले आहे. तर हेटवणे धरणाची पाण्याची पातळी ही सध्या 86.10  मीटरपर्यंत पोहोचली आहे. हवामान अंदाजानुसार आणि पाणलोटातील पावसाच्या तीव्रतेनुसार स्पिलवेचे दरवाजे उघडले जाणार आहेत. पेण परिसरातील ग्रामपंचायती आणि भोगेश्वरी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

तळकोकणात पावसाची संततधार पाऊस, सिंधुदुर्गातील वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात पावसाची हजेरी

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 407.541 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.10 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 5 हजार 577 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तिलारी नदी पात्रात सुरु आहे. जिल्ह्यात इतर भागात मात्र ढगाळ वातावरण आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rain :  मुंबईत आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी भरायला सुरुवात झाला आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळं पूर्णतः काळोख झाला आहे. यामुळं रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालक वाहन जपून चालवत आहेत. पश्चिम उपरागरातून मुंबई शहराकडे येणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी गोरेगाव अंधेरी विलेपार्ले सांताक्रुज या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहने संथगतीने जात असल्यामुळं अनेकांना कामावर पोहोचण्यास आज विलंब होणार आहे. सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेला वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह ॲम्बुलन्सला सुद्धा या वाहतूक कोंडीमधून मार्ग काढावा लागत आहे.

गेल्या 24 तासात वसई-विरारमध्ये 67 मिलिमीटर पावसाची नोंद, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Vasai-Virar Rain : मागील 24 तासात वसई-विरार परिसरात 67 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचत आहे. परंतू, तितक्याच प्रमाणात पाण्याचा निचरा देखील होत आहे.  तर दुसरीकडे तुम्ही मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन तुम्हीं प्रवास करणार असाल तर आजचा दिवस जरा राखून ठेवा. कारण या महामार्गावर जवळपास दिड ते दोन किलोमीटरच्या  रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. महामार्गावर याआधी पडलेले खड्डे आणि सततचा दोन दिवसापासून पडणारा पाऊस त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. थेट ठाण्यापर्यंत वाहतूक कोंडी असून दहिसर टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी असल्याचे चित्र समोर आले आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसाने महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने घट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने घट होऊ लागली आहे. पंचगंगेची पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ 25 फुट 10 इंच इतकी होती. जिल्ह्यातील अजूनही 26 बंधारे पाण्याखाली आहेत. 





पालघरमधील धामणी धरण 100 टक्के भरलं, नागरिक समाधानी

पालघरसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पालघरमधील सर्वात मोठा सूर्या प्रकल्पातील धामणी हे धरण 100 टक्के भरलं आहे. याच धामणी धरणातून विक्रमगड, डहाणू, पालघर या भागातील दुबार शेतीसह बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र, पालघर जिल्ह्यातील अनेक नागरी भाग आणि वसई विरार, मीरा-भाईंदर या सारख्या बड्या महानगरपालिकांना पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी ऑगस्टच्या सुरुवातीलाच 100 टक्के भरणारं हे धरण या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर शंभर टक्के भरले आहे.


 

ठाण्यात पावसाचा जोर वाढला, मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर 10 मिनिटे उशिराने

Thane Rain : ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या एका तासापासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. स्टेशनवर देखील रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे, मात्र लोकल सेवा सुरु आहे. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे तर ट्रान्स हार्बर 10 मिनिटे उशिराने धावत आहे.

रायगड जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरु

Raigad Raid : रायगड जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरु आहे. माणगाव, नागोठणे, उरण, सुधागड परिसरात हलक्या सरी सुरु आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. 

पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कमी, एक तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरु

Mumbai Rain : पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अंधेरी सबवे खाली पाणी कमी झालं आहे. त्यामुळं अंधेरी सबवे पुन्हा वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. अंधेरी सबवे एक तास बंद होता. एक तासानंतर पुन्हा सुरु करण्यात आला आहे. अंधेरी सबवे सुरु केल्यानंतर अंधेरी पूर्व ते पश्चिमला जाणारा वाहनांचा मोठ्या रांगा लागलेला आहे.

Thane Rain Updates : ठाण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात, रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात

Rain Updates : ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  ठाणे स्टेशनवर देखील रुळांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र, लोकल सेवा सुरू असून मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे तर ट्रान्स हार्बर 10 मिनिटे उशिराने धावत आहे. 

मुंबई आणि उपगनरात पावसाचा जोर वाढला; मुंबईतील लोकलसेवा धीम्या गतीने सुरु, पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावरी वाहतूकही मंदावली

Mumbai Rains : मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरारमध्ये जोरदार पाऊस, मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा धीम्या गतीने सुरु, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने 

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असल्यानं जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाहतूक मंदावणे, झाडांची पडझड होण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु

Palghar Rain : पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. पश्चिम किनारपट्टीसह डहाणू, तलासरी, बोईसर, कासा, विक्रमगड या भागात मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. 

धुळे शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात

Dhule Rain : धुळे शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांश तालुक्यात चांगला पाऊस सुरु आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे, सांताक्रुज, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये गेल्या 15 मिनिटापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. रात्रभर मुंबईत पावसाची रिपरिपस सुरु होती. त्यानंतर सकाळपासून मुंबईसह, ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं हजेर लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.