Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Sep 2022 10:38 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात...More

रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं भिवंडीत रस्त्यांवर साचलं पाणी

Bhiwandi Rain : हवामान खात्याने दर्शवल्याप्रमाणं पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज  व्यक्त केला असताना  भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ, गुडघाभर पानी साचले आहे. तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.