Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर..
Maharashtra Rain Live : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, गणपतीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
Nashik Rain : मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेले आहेत. यासोबतच पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकाळपासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारनंतर 6 हजार क्यूसेक्सने पाणी गोदापात्रात सोडलं जात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने चाकरमाण्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक गणेश मंडळांच्या देखाव्यांची कामे रखडली तर भक्तांचाही हिरमोड झाला.
श्री गणेशाच्या आगमनापाठोपाठ शिर्डी शहरासह परिसरात काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाची 115 मिमी नोंद झाली असून या पावसामुळे अक्षरशः शिर्डी शहराला नदीच स्वरुप प्राप्त झालं आहे. नगर-मनमाड महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच साई प्रसादालय, शासकीय विश्रामगृह आणि एमएससीबीच्या कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये देखील पाणी शिरले असून रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. राहता तालुक्यातील अनेक गावातील शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून प्रशासनाने सकाळपासून मदतकार्य सुरु केलं आहे.
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात धुवाधार पाऊस झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसानं सर्वदूर हजेरी लावली. ओढे-नाले तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. शिर्डीतील शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आणि महावितरण कार्यालयास पाण्याचा वेढा पडला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांवरील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शिर्डीसह संगमनेर, कोपरगावसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
वर्धा शहरासह ग्रामीण भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. आज बरसलेल्या पावसामुळं नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.
Nashik Rain : गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी दमदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहयला मिळाले. त्याचबरोबर नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभर नाशिक शहर आणि परिसरात पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा दमदार पावासाला सुरुवात झाल्यानं गंगापूर धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Nandurbar Rain : गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं नंदूरबार जिल्ह्यात हजेरी लावली आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे पाऊस झाला नव्हती. शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर तिथे चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, गणपतीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बुधुवारी सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट
पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -