Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना दिलासा

Maharashtra Monsoon Rain LIVE : मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला.तसेच राज्याच्या इतरही भागाव पावसानं दरदार हजेरी लावली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2022 10:00 AM
मलकापूर तालुक्यातील देवधाबा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी

रविवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसानं बुलढाण्याच्या देवधाबा परिसरात नदी नाल्यांना पूर आला होता. यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगाडाटात आलेल्या पावसानं मात्र शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह गुरांचीही फजिती झाली आहे. या पावसानं शेतकरी सुखावला असून आगामी काळात पेरणीपूर्व कामांना गती मिळणार आहे.

फुलंब्री तालुक्यातील साताळा इथं अंगावर वीज पडल्यानं दोघांचा मृत्यू

Aurangabad Rain:  औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान फुलंब्री तालुक्यातील साताळा येथे शेतात काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कन्नड तालुक्यातील नागद येथे एका झाडाखाली उभा असलेल्या महिलांच्या अंगावर वीज पडल्याने सात महिला आणि एक पुरुष जखमी झाला आहे. 

या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला उधाण येणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्याच्या विविध भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पेरणीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झालं आहे. दरम्यान, या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला उधाण येणार आहे. यावेळी लाटांची उंची ही 4.87 मीटर असणार आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी सुमद्रकिनारी काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.  
  

अहमदनगरमधील 14 महसूल मंडळात दमदार पाऊस; नगर, पाथर्डी आणि राहुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील 14 महसूल मंडळात पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस नगर, पाथर्डी आणि राहुरी तालुक्यात झाला. पहिल्याच पावसामुळे पिंपळगावच्या तलावात नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.
बुलढाण्यात मुसळधार पावसाने लोणार तालुक्यातील चार गावाचा संपर्क तुटला, पहिल्याच पावसात वळण रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

Buldhana Rain : बुलढाण्यात काल (12 जून) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने लोणार तालुक्यात निर्माणाधीन पुलाचं काम वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वळण रस्ताही वाहून गेल्याने कोनाटी, झोटिंगा, देऊळगाव कोळ, महार चिकना या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. काल दुपारी बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात काही ठिकाणी दाणादाण उडाली आहे. मार्गावर पुलाचं काम चालू असल्यामुळे वळण रस्ता वाहून गेला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर कोणतीच वाहने जात नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे. संबंधित ठेकेदाराने आणि प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. तर मलकापूर तालुक्यात फक्त 30 मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने देवधाबा गावातील काही घरात पाणी शिरल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसानं बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चार गावाचा संपर्क तुटला

रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने लोणार तालुक्यातील पुलाच काम वाहून गेल्यानं चार गावाचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वळण रस्ताही वाहून गेल्याने कोनाटी, झोटिंगा , देऊळगाव कोळ, महार चिकना या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पहिल्याच पावसात काही ठिकाणी दाणादाण उडाली आहे. मार्गावरील पुलाचे काम चालू असल्यामुळे वळण रस्ता वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.कोणतीच वाहने जात नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे.  संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. तर मलकापूर तालुक्यात झालेल्या पावसाने देवधाबा गावातील काही घरात पाणी शिरल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Rain LIVE : कोकण आणि मुंबईत दाखल झालेला मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. काल मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रात 279 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 


उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिक,पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. कालपासून राज्यातल्या विविध भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.


काल झालेल्या मुसळधार पावसानं लोणार तालुक्यातील वळण रस्ता वाहून गेला आहे. लोणार ते महारचिकना मार्गावरील पुलाचे काम चालू आहे. असल्यामुळं वळण रस्ता तयार केला होता, तो वाहून गेला आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीवरून पुढे पायी सुद्धा जाता येत नाही, कोणतीच वाहने जात नसल्यामुळं प्रवाशांना खूप त्रास होत आहे. संबंधित ठेकेदारानं आणि प्रशासनानं लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. पहिल्याच पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.


बीड जिल्ह्यातील आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला. गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफलो झाले आहेत. आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरुणराजानं मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत दुष्काळ मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसानं सुरुवात झाली आहे.


आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मात्र मृग नक्षत्र सुरु होऊन चार दिवसानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.